भारताने दक्षिण आफ्रिकेविरोधात दुसऱ्या टी 20 सामन्यात अडचणीत सापडले आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 15 धावांवर तिसरी विकेट गमावली. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला, तर अभिषेक शर्माला फक्त 4 धावा करता आल्या. सुर्यकुमार यादवही 4 धावा करून माघारी परतला. आफ्रिकेच्या मार्को जॉन्सन आणि जी कोएत्झी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

सेंट जॉर्ज पार्क, गकेबरहा येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी 20आय सामन्यात भारतीय संघासाठी खूप महत्वाचा सामना आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल.
SA vs IND 2nd T20

सामन्याच्या आधी 7 वाजता टॉस पार पडला, ज्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी बोलावले. कॅप्टन एडन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका आता पॅटर्न बदलून भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी प्रचंड हल्लाबोल करत 200 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या, त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही अशाच धमाकेदार फलंदाजीची अपेक्षा केली जात आहे.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन:

1. एडन मार्करम (कर्णधार)


2. रायन रिकेल्टन


3. रीझा हेंड्रिक्स


4. ट्रिस्टन स्टब्स


5. हेनरिक क्लासेन (विकेटकीपर)


6. डेव्हिड मिलर


7. मार्को जॅनसेन


8. अँडीले सिमेलेन


9. जेराल्ड कोएत्झी


10. केशव महाराज


11. न्काबायोमझी पीटर



टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन:

1. सूर्यकुमार यादव (कर्णधार)


2. संजू सॅमसन (विकेटकीपर)


3. अभिषेक शर्मा


4. तिलक वर्मा


5. हार्दिक पांड्या


6. रिंकू सिंग


7. अक्षर पटेल


8. अर्शदीप सिंग


9. रवी बिश्नोई


10. वरुण चक्रवर्ती


11. आवेश खान



भारताने पहिल्या सामन्यात उत्कृष्ट खेळ दाखवला होता आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुढच्या प्रयत्नांचा सामना करण्यासाठी त्यांना संघातील फलंदाजीवर भर देणे आवश्यक आहे. दुसऱ्या टी 20आय सामन्यात फोकस कसा असेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.