माझी लाडकी बहीण योजनेची माहिती
योजनेचं नाव: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
लाभ: महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये
प्रारंभकर्ता: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
योजनेची सुरुवात: 28 जून 2024
लाभार्थी: 21 ते 64 वर्ष वयोगटातील महाराष्ट्रातील महिला
उद्देश: महिलांना आर्थिक मदतीचा लाभ देणे
अर्जाची अंतिम तारीख: सप्टेंबर 2024
रक्कम: दरमहा 1500 रुपये
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन व ऑफलाइन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू महिलांना आर्थिक मदतीसाठी सुरू केली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सक्षमता मिळवून देणे आणि त्यांच्या रोजच्या गरजा भागवणे हा आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 64 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. योजनेची घोषणा 28 जून 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
लाडकी बहीण योजनेची महत्त्वाची वैशिष्ट्ये
लाभार्थ्यांचा वयोगट: 21 ते 64 वर्षे
आर्थिक मदत: दरमहा 1500 रुपये
लाभार्थ्यांची पात्रता: महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला
मुख्य उद्देश: महिलांना आर्थिक मदत देऊन त्यांचा सन्मान आणि सक्षमता वाढवणे
अर्जाची अंतिम तारीख: सप्टेंबर 2024
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन आणि ऑफलाइन
अर्ज कसा करावा?
महिला आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा CSC केंद्रात जाऊन या योजनेचा ऑनलाइन अर्ज सबमिट करू शकतात. अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, बँक खाते तपशील आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
लाडकी बहीण योजनेच्या फायद्यांमध्ये समाविष्ट असलेले मुद्दे
- आर्थिक साक्षरता वाढवणे आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या स्थिर बनवणे
- गरजू महिलांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे
- कुटुंबाच्या आर्थिक गरजांमध्ये मदत
ही योजना महिलांच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
अलीकडेच, सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे एकत्रित पैसे निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. मात्र, ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही, त्यांनी आपल्या पेमेंट स्थितीची तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी, महिलांनी जवळच्या बँकेत जाऊन DBT (Direct Benefit Transfer) सेवा सक्रिय करावी.
माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
महाराष्ट्र सरकारने योजनेचा अर्ज व पेमेंट स्थिती तपासण्यासाठी एक पोर्टल उपलब्ध करून दिले आहे. येथे अर्जदार महिलांनी पुढीलप्रमाणे स्थिती तपासू शकतेः
- testmmmlby.mahaitgov.in पोर्टलवर जा.
- लॉगिन पेज उघडल्यावर 'Beneficiary Status' या पर्यायावर क्लिक करा.
- लाभार्थी स्थिती पेज उघडल्यानंतर, आपला नोंदणी क्रमांक आणि मोबाइल क्रमांक प्रविष्ट करा.
- मोबाइल क्रमांकावर OTP मिळेल; तो टाकून ‘Get Data’ वर क्लिक करा.
- पुढील पेजवर योजनेची स्थिती व पेमेंटची माहिती उपलब्ध असेल.
अशाप्रकारे, महिलांना त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तपासणे सोयीचे झाले आहे.