मुंबई, दि. ०२ नोव्हेंबर २०२४ : विधानसभा निवडणूक-२०२४ अंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्हाधिकारी व अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
मुंबई शहरातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी या मतदारसंघांसाठी केंद्रीय खर्च निरीक्षक म्हणून विजय बाबू वसंता काम पाहतील. शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या मतदारसंघांसाठी अमन प्रित यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
खर्च तपासणीच्या तारखा: १) गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४
२) बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४
३) सोमवार, १८ नोव्हेंबर २०२४
तपासणी स्थळ:
सह्याद्री अतिथीगृह, तळमजला बैठक कक्ष, मलबार हिल, मुंबई
तपासणीची वेळ:
सकाळी १० ते दुपारी १
सर्व उमेदवार आणि प्रतिनिधींनी दैनंदिन खर्च नोंदवही, रोख नोंदवही, बँक नोंदवही, देयके, प्रमाणके, बँक पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रांसह तपासणीसाठी ठरलेल्या दिवशी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. यादव यांनी केले आहे.