Ayushman Bharat Vay Vandana Card: केंद्र सरकारने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत 70 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेल्या वरिष्ठ नागरिकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. या योजनेतून, आता 70 वर्षांवरील सर्व वरिष्ठ नागरिकांना ₹5 लाख पर्यंत मोफत उपचार उपलब्ध होतील. यासाठी, आयुष्मान वय वंदना कार्डची घोषणा करण्यात आली आहे. या कार्डाच्या माध्यमातून, वृद्ध नागरिक 29,000 हून अधिक सरकारी आणि खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार घेऊ शकतात.
या योजनेसाठी कोणतेही आर्थिक निकष नाहीत, त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय सर्व वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे वृद्ध नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरवणे आणि त्यांना आर्थिक अडचणीशिवाय उपचार मिळवून देणे.

वाचा सविस्तर -

आवश्यक कागदपत्रे जसे आधार कार्ड, मोबाइल नंबर, आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण करून वरिष्ठ नागरिक या कार्डसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकतात. भारतातील वयोवृद्ध नागरिकांची संख्या वाढत असल्यामुळे, या योजनेंचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि भविष्यात 70 वर्षे किंवा त्याहून जास्त वय असलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा पूर्ण होऊ शकतील.