JioHotstar.com domain ownership: JioHotstar.com डोमेनच्या ताब्याबाबत सध्या एक वेगळाच वाद समोर आला आहे. पूर्वी हा डोमेन दिल्लीतील एका तरुण सॉफ्टवेअर डेवलपरच्या मालकीचा होता. त्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला हा डोमेन विकण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु दुबईतील दोन मुलांनी, जैनम आणि जीविका यांनी आता हा डोमेन विकत घेतला आहे. (Dubai kids buy JioHotstar domain) त्यांनी हा निर्णय दिल्लीतील या डेवलपरला आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने घेतल्याचं सांगितलं आहे.(Delhi developer sells JioHotstar domain)
कस सुरू झाला हा वाद?

Disney+ Hotstar rebranding: दिल्लीतील सॉफ्टवेअर डेवलपरने स्वतःला ‘ड्रीमर’ या नावाने एक पोस्ट jiohotstar.com वर शेअर केली होती. त्यात त्याने सांगितले की, तो एक तरुण ऐप डेवलपर आहे आणि त्याला स्वतःचा स्टार्टअप सुरू करायचा आहे. 2023 च्या सुरुवातीला त्याला सोशल मीडियावर वाचायला मिळाले की, Disney+ Hotstar IPL चे स्ट्रीमिंग अधिकार गमावल्यामुळे त्यांचे सक्रिय यूजर्स घटत आहेत. ह्यामुळे Disney कंपनी Hotstar ला कोणत्यातरी भारतीय कंपनीला विकण्याचा विचार करत आहे.

JioCinema and Hotstar merger: त्यावेळी Sony आणि Zee यांच्यात मर्जरची चर्चा सुरू होती, म्हणून रिलायन्सच्या मालकीची Viacom 18 ही Disney+ Hotstar ला विकत घेणारी एकमेव मोठी कंपनी राहणार होती. यामुळे त्या डेवलपरला आठवण झाली की, जियोने Saavn ही म्युझिक स्ट्रीमिंग सेवा विकत घेतली होती आणि तिला JioSaavn असं नाव दिलं होतं. ह्याच धर्तीवर त्याला वाटलं की Disney+ Hotstar ला देखील JioHotstar असं नाव दिलं जाऊ शकतं. त्याने तपासले असता त्याला कळले की, JioHotstar.com हा डोमेन उपलब्ध आहे. त्याने लगेचच हा डोमेन विकत घेतला, आणि त्याच्या मनात आलं की या मर्जरमुळे त्याच्या कॅम्ब्रिजमधील शिक्षणाचा खर्च निघेल.

कॅम्ब्रिज विद्यापीठातील शिक्षणाच स्वप्न

सॉफ्टवेअर डेवलपरने लिहिलं की त्याचं स्वप्न होतं की तो कॅम्ब्रिज विद्यापीठातील एंटरप्रेन्योरशिपवरील डिग्री प्रोग्रॅममध्ये प्रवेश घेईल. त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. म्हणून त्याने JioHotstar.com हा डोमेन विकत घेतला आणि रिलायन्स इंडस्ट्रीजकडून त्याचे पैसे मिळतील अशी आशा केली.

रिलायन्स इंडस्ट्रीजची प्रतिक्रिया आणि कायदेशीर चर्चा

24 ऑक्टोबरला डेवलपरने एक अपडेट शेअर केले ज्यात त्याने सांगितले की, रिलायन्सच्या एका अधिकाऱ्याने त्याच्याशी संपर्क साधला होता. त्याने आपल्या EMBA प्रोग्रामसाठी ट्युशन फीची मागणी केली होती, परंतु कंपनीने ती मागणी नाकारली. कंपनीने त्याच्याविरुद्ध कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्याचा विचार व्यक्त केला. डेवलपरने सांगितलं की, 2023 मध्ये हा डोमेन घेताना कोणत्याही ट्रेडमार्क नियमांचे उल्लंघन केलेले नाही कारण तेव्हा ‘JioHotstar’ हे नाव अस्तित्वात नव्हतं.

दुबईतील दोन यूट्यूबर मुलांची मदत

सध्या JioHotstar.com वर दिल्लीच्या त्या सॉफ्टवेअर डेवलपरचा पोस्ट नाही, त्याऐवजी दुबईतील जैनम आणि जीविका यांच्याकडून एक संदेश आहे. त्यात त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी दिल्लीच्या त्या तरुण सॉफ्टवेअर डेवलपरला मदत करण्याच्या उद्देशाने हा डोमेन विकत घेतला आहे.

JJ Funtime यूट्यूब चॅनेल आणि त्यांचे पुढचे पाउल

JJ Funtime YouTube channel Dubai: जैनम आणि जीविका हे JJ Funtime नावाचा यूट्यूब चॅनल चालवतात. 2017 मध्ये सुरू केलेल्या या चॅनेलवर सुरुवातीला खेळणी अनबॉक्सिंगचे व्हिडिओ होते, नंतर त्यावर विज्ञानविषयक व्हिडिओ यायला लागले. सध्या या दोघांचे लक्ष पॉडकास्ट लॉन्च करण्याकडे आहे, ज्यात काही एपिसोड्स प्रसिद्ध व्यक्तींसोबत रेकॉर्ड केले गेले आहेत आणि ते लवकरच लाईव्ह होणार आहेत.

दिल्लीच्या सॉफ्टवेअर डेवलपरचा कॅम्ब्रिजमधील शिक्षणाचा स्वप्न, रिलायन्स इंडस्ट्रीजशी झालेली चर्चा आणि दुबईतील दोन मुलांनी केलेली मदत या सर्वांमुळे JioHotstar.com च्या मालकीचा हा अनोखा वाद सध्या चर्चेत आहे.