ऑक्टोबर 2024 पासून ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) बनावट कॉल आणि मेसेज थांबवण्यासाठी कडक नियम लागू केले आहेत. यामुळे नेटवर्क स्तरावरच अशा कॉल्सना अडवता येईल. टेलिकॉम कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial intelligence in telecom) वापर करून फसव्या कॉल्सना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. तरीही स्कॅमर सतत नवनवे मार्ग शोधत आहेत आणि लोकांना फसवणुकीच्या जाळ्यात अडकवत आहेत.
VoIP कॉल्सद्वारे स्कॅम्सची वाढ

TRAI new rules 2024: ट्रायच्या नव्या धोरणाने नेटवर्कवरून येणारे बनावट कॉल आणि मेसेज अडवण्याची तरतूद केली आहे, पण स्कॅमर आता इंटरनेट कॉल्सचा, म्हणजेच VoIP (व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल) कॉल्सचा वापर करून फसवणूक करत आहेत. या कॉल्समध्ये इंटरनेटचा वापर होत असल्यामुळे, त्यांचा मागोवा घेणे खूप कठीण ठरते. व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (VPN) च्या मदतीने केलेले हे कॉल्स पूर्णपणे इंटरनेटवर आधारित असतात, त्यामुळे कॉल करणाऱ्याचे ठिकाण शोधणे अवघड असते. स्कॅमर इंटरनेट कॉल्स वापरून सामान्य नागरिकांना फसवतात, स्वतःला सरकारी संस्था किंवा बँकेचे प्रतिनिधी म्हणून दाखवतात आणि वैयक्तिक माहिती मिळवून घेतात.

+697 आणि +698 पासून सुरू होणारे कॉल्स

Fraudulent calls India: थायलंडच्या टेलिकॉम अधिकाऱ्यांनी या नव्या धोकेबाज कॉल्सबाबत इशारा दिला आहे, ज्यात +697 किंवा +698 पासून सुरू होणारे आंतरराष्ट्रीय नंबर असतात. हे कॉल्स बऱ्याचदा स्कॅमरकडून केले जातात आणि त्यामुळे हा नंबर दिसल्यास त्यावर कॉल न घेणे चांगले आहे. या कॉल्समुळे मोबाइल हॅक होऊ शकतो आणि अकाउंट रिकामे होण्याची शक्यता असते. कॉल उचलल्यास, स्कॅमर आपल्या फोनमध्ये मालवेअर घालण्याचा प्रयत्न करू शकतात किंवा आपली वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरू शकतात.(Scam call prevention)

ट्रायची नवीन धोरणे

ऑक्टोबर 2024 पासून ट्रायने नवीन धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे, ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने बनावट कॉल्स आणि मेसेज ओळखले जातात. टेलिकॉम कंपन्यांना अशा फसव्या कॉल्सना अडवण्यासाठी पुढे आले पाहिजे. तरीही इंटरनेट कॉल्सचा वापर केल्यामुळे अनेक स्कॅमर टेलिकॉम कंपन्यांना चकवा देत आहेत. VPN वापरून हे कॉल्स केले जात असल्याने स्कॅमरचा ठावठिकाणा शोधणे कठीण असते.

इंटरनेट कॉल्सचे धोके

इंटरनेट कॉल्सचा वापर करून स्कॅमर सहजपणे कोणत्याही फोन नंबरच्या रूपात कॉल करू शकतात, ज्यामुळे कॉल ओळखणे आणि त्यावर योग्य कारवाई करणे कठीण होते. हे कॉल्स बऱ्याचदा आक्रमक मार्केटिंगसाठी, फसवणुकीसाठी किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यासाठी वापरले जातात. त्यामुळे +697 किंवा +698 ने सुरू होणाऱ्या नंबरवरून येणारे कॉल्स उचलू नयेत आणि त्वरित त्या नंबरला ब्लॉक करणे आवश्यक आहे.

स्कॅम्स कसे रिपोर्ट कराल?

How to report scam calls: केंद्र सरकारने या प्रकारच्या फसवणुकीसाठी 'संचार साथी' वेबसाइटवर 'चक्षु' पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्ही संशयास्पद कॉल्स आणि मेसेज रिपोर्ट करू शकता. अशा फसव्या कॉल्स आल्यास त्यांना पुनः कॉल करण्याचा सांगावा द्या आणि त्यांच्या संस्थेचे अधिकृत संपर्क क्रमांक मागा. जर ते नंबर देण्यास नकार देत असतील, तर हे स्कॅम असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.

या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, लोकांनी सावध राहून अनोळखी आणि संशयास्पद कॉल्सवर विश्वास ठेवू नये, त्यांना उत्तर देऊ नये, आणि वैयक्तिक माहिती शेअर करू नये.(Telecom regulations in India)