गृहमंत्री अमित शाह यांनी लॉन्च केले CRS मोबाईल अ‍ॅप, जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रिया होणार सुलभ

गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच Civil Registration System (CRS) नावाचे नवीन मोबाईल अ‍ॅप लॉन्च केले आहे, ज्यामुळे भारतात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणे अधिक सुलभ होणार आहे. Registrar General and Census Commissioner of India कडून विकसित केलेले हे अ‍ॅप नोंदणी प्रक्रियेत सुधारणा करणार आहे, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या राज्याच्या अधिकृत भाषेत, कधीही आणि कुठेही नोंदणी करता येणार आहे.
अमित शाह यांनी या अ‍ॅपबद्दल माहिती देताना X वर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, "या अ‍ॅपद्वारे नोंदणीसाठी लागणारा वेळ कमी होईल." त्यांनी या पोस्टसोबत भारताच्या रजिस्ट्रार जनरलचा एक व्हिडिओ देखील शेअर केला, ज्यामध्ये अ‍ॅपचा इंटरफेस दाखवला आहे. हे अ‍ॅप डिजिटल प्रमाणपत्र वितरण आणि लेगसी रेकॉर्डचे ऑनलाइन डिजिटायझेशन सक्षम करते, आणि याच्या वापरामुळे राज्यांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही.


CRS अ‍ॅप कसे वापरावे?

birth and death registration process
: CRS मोबाईल अ‍ॅप वापरण्यासाठी, युजरला प्रथम अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर, युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करणे आवश्यक आहे. लॉगिन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, अ‍ॅप कडून captcha पूर्ण करण्यास सांगितले जाईल, आणि त्यानंतर SMS द्वारे ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी दिल्यानंतर, लॉगिन प्रक्रिया पूर्ण होईल.

CRS अ‍ॅपच्या होम स्क्रीनवर जन्म आणि मृत्यू नोंदणीची लिंक उपलब्ध असेल. जन्म नोंदणीसाठी, युजरने "Birth" वर टॅप करून "Register Birth" पर्याय निवडावा. त्यात बाळाची जन्म तारीख, पत्ता आणि कुटुंबियांची माहिती भरणे आवश्यक आहे. मृत्यू नोंदवण्यासाठी, "Death" > "Register Death" चा पर्याय निवडावा लागेल. नोंदणी सशुल्क आहे, त्यामुळे पेमेंट पूर्ण झाल्यानंतर प्रमाणपत्र तयार केले जाईल. याशिवाय, CRS अ‍ॅपवरून जन्म आणि मृत्यूचे प्रमाणपत्र डाऊनलोड देखील करता येईल.(user-friendly registration app)

डिजिटल गव्हर्नन्सच्या दृष्टीने हे अ‍ॅप डिझाइन केले गेले आहे, ज्यामुळे नोंदणी प्रक्रिया अधिक जलद आणि पेपरलेस होणार आहे.

वाचा पुढील माहिती: