बारामतीत भव्य स्वागत
(Suraj Chavan) सूरज चव्हाण 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडताच तो त्याच्या गावी, बारामतीकडे रवाना झाला. बारामतीमध्ये पोहोचताच त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशांच्या गजरात बारामतीकरांनी सूरजवर अभिमान व्यक्त केला. शहरातील लोकांनी त्याचं स्वागत करताना मोठा उत्सव साजरा केला आणि सर्वत्र आनंदमयी वातावरण पाहायला मिळालं.
'बिग बॉस'मधील प्रवास आणि अंकिता वालावलकरची साथ
सूरज चव्हाणच्या प्रवासात अंकिता वालावलकर ही एक महत्त्वाची व्यक्ती ठरली. ' Bigg Boss 'च्या घरात अनेकदा वाद आणि भांडणं होत असताना, अंकिता नेहमी सूरजला सल्ला देताना दिसली. तिने त्याला घरातल्या अनेक गोष्टी शिकवल्या आणि वेळोवेळी त्याला मार्गदर्शन केलं. मात्र, काही प्रेक्षकांना वाटलं की अंकिता सूरजचा वापर सहानुभूती मिळवण्यासाठी करत आहे. यावर अंकिताने मुलाखतीत स्पष्ट केलं की, तिचा हेतू कधीही वाईट नव्हता. ती फक्त सूरजला मदत करत होती, जेणेकरून त्याला घरातून बाहेर पडल्यानंतर कोणतीही समस्या येऊ नये.
अंकिताची कळकळीची कमेंट
Ankita Valawalkar: सूरज घराबाहेर आल्यावर अनेक चाहत्यांनी त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला, आणि सलग दोन दिवस त्याचं कौतुक होत राहिलं. मात्र, यामुळे त्याला मानसिक आरामाची गरज असल्याचं अंकिता वालावलकरने लक्षात आणून दिलं. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सूरजसाठी एक कळकळीची कमेंट केली. "आम्ही अशा वातावरणातून आलो आहोत की शहरी जीवनाचा त्रास होतो आहे. सूरजला सध्या खऱ्या अर्थाने सांभाळण्याची गरज आहे. 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर तो खूप तणावाखाली आहे, आणि त्याला थोडा आराम आवश्यक आहे," असं ती म्हणाली. तिच्या या विधानामुळे अनेकांच्या नजरा तिच्याकडे वळल्या.
सूरजचा विजय आणि पुढील वाटचाल
bigg boss marathi live: सूरज चव्हाणच्या 'बिग बॉस' विजयानंतर त्याला आता मनोरंजन क्षेत्रात नवे संधी मिळण्याची शक्यता आहे. चाहत्यांकडून आणि राजकीय व्यक्तींकडून येणाऱ्या शुभेच्छांच्या वर्षावामुळे त्याचं भविष्य उज्ज्वल दिसत आहे. मात्र, मानसिक आराम आणि शांतता या सध्या त्याच्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, असं अंकिता सांगते.