Bigg Boss Season 5 Winner Suraj Chavan : प्रेक्षकांनी ज्याची आतुरतेने वाट पाहिली होती तो क्षण अखेर आला आहे. 'बिग बॉस मराठी ५' चा महाअंतिम सोहळा मोठ्या थाटात पार पडला आणि या सोहळ्यात रीलस्टार सुरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी ५' ची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. बारामतीच्या सुरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचा विजेता होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच एका रीलस्टारने ही ट्रॉफी जिंकली आहे, ज्यामुळे सुरजच्या चाहत्यांचा आनंद ओसंडून वाहत आहे. प्रेक्षक त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.(bigg boss live marathi)
Big Boss Marathi Winner 2024: सुरज चव्हाण, जो 'गुलिगत धोका' या रीलमुळे प्रसिद्ध झाला, तो बारामतीच्या एका छोट्या गावातील मुलगा आहे. टिकटॉकवर रील्स बनवून त्याला लोकप्रियता मिळाली. अत्यंत कठीण परिस्थितीतून वर येत सुरजने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. पैसे कमावण्यासाठी त्याने कधीकाळी माथाडी कामगाराचं कामही केलं होतं. त्याचा प्रवास खडतर होता. शिक्षण कमी असल्याने बिग बॉसच्या घरात त्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सुरुवातीला सुरज(suraj chavan)ने या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता, परंतु बिग बॉस मराठीच्या टीमने त्याची समजूत काढत त्याला सहभागी केलं. त्याच्या साधेपणाने आणि विनम्र स्वभावामुळे त्याने सर्वांची मनं जिंकली. टास्कमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत, सर्वांशी आदरपूर्वक वागून त्याला प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा मिळाला.
अखेर सर्व अडथळे पार करून, सुरज आता बारामतीचा किंग बनला आहे. 'बिग बॉस मराठी ५' (marathi bigg boss winner)ची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुरजमुळे तळागाळातील प्रेक्षकही 'बिग बॉस मराठी' सारख्या शोशी जोडले गेले आहेत. आता बारामतीतील लोक त्याचं कसं स्वागत करणार, याची उत्सुकता आहे.