दरम्यान, आता सलमान खानच्या 'सिकंदर(sikandar movie)' चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये आराध्या बच्चन सलमान खानला भेटताना आणि मिठी मारताना दिसत आहे. या फोटोंनी सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घातला असून, चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. अनेकांना या फोटोंवर धक्का बसला आहे आणि त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
परंतु, या फोटोंचा खरा खुलासा झाला आहे. व्हायरल झालेला फोटो आराध्या बच्चनचा नसून, भारतीय बॉक्सर निखत जरीनचा (Nikhat Zareen) आहे. कोणीतरी निखत जरीनच्या चेहऱ्याला बदलून त्यावर आराध्याचा चेहरा लावला आहे. त्यामुळे या फोटोंची सत्यता खोटी असल्याचे समोर आले आहे.(salman khan bigg boss)
सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे, आणि अभिनेता सत्यराज देखील या चित्रपटाचा भाग आहे. हा चित्रपट 30 मार्च 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे, ज्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.(salman khan filmography)