एअर इंडियाचे त्रिची ते शारजाह विमान संकटात
Air India's Trichy to Sharjah flights in crisis: शुक्रवारी, ११ तारखेला सायंकाळी त्रिची एअरपोर्टवर नेहमीप्रमाणे गजबज सुरू असताना एअर इंडियाच्या फ्लाइट आयएक्स ६१३ या विमानात उंच आकाशात अचानक बिघाड झाला. १४० प्रवाशांचे जीव धोक्यात असल्याची बातमी समजताच त्रिची विमानतळावर खळबळ उडाली. विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याने विमानाचे संचालन अवघड झाले होते, ज्यामुळे वैमानिकांना विमान उतरण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागले.
विमानात बिघाड झाल्याची बातमी मिळताच विमानतळावर एमर्जन्सी घोषित करण्यात आली आणि सुरक्षेसाठी तातडीने २०हून अधिक रूग्णवाहिका व अग्निशमन दल घटनास्थळी पाठवले गेले. पायलट क्रोम रिफादली फहमी झैनाल आणि सहवैमानिक मैत्रेयी शितोळे(Maitreyi Sitole) या दोघांनी विमान सुरक्षित उतरण्यासाठी पूर्ण धैर्याने आणि कौशल्याने परिस्थिती हाताळली. अखेर धावपट्टीचा अंदाज घेऊन त्यांनी विमानाचे यशस्वीपणे लँडिंग केले.
मैत्रेयी शितोळेचे धाडस
Maitreyi Shitole of Pune: पुण्याची मैत्रेयी शितोळे, जी गेल्या चार-पाच वर्षांपासून एअर इंडियामध्ये सहवैमानिक म्हणून काम करते, तिच्या या धाडसाने १४० प्रवाशांचे प्राण वाचवले. न्यूझीलंडच्या मेनलँड एव्हिएशन कॉलेज, ड्युनेडिन येथे तिने वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले असून तिथेच तिने व्यावसायिक पायलट म्हणून काम सुरू केले होते. परंतु नंतर भारतात परतल्यावर २०१९ पासून ग्राऊंड इन्स्ट्रक्टर म्हणून तिने काम करण्याचा निर्णय घेतला. एअर नेव्हिगेशन, तांत्रिक कौशल्ये, आणि उड्डाणातील नैतिकता यामध्ये तिने प्राविण्य मिळवले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून(Savitribai Phule Pune University) फिजिक्समध्ये डिग्री घेतलेल्या मैत्रेयीने वैमानिक होण्याआधीच तणावाखाली काम करण्याचे आणि डेडलाइनच्या आधी काम पूर्ण करण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. तिचे प्रशासकीय आणि संगणकीय कामातही निपुणता आहे.
बिघाड कसा झाला?
विमानाच्या हायड्रॉलिक सिस्टिममध्ये झालेला बिघाड हा अतिशय गंभीर होता. हायड्रॉलिक सिस्टिममध्ये बिघाड झाल्याने विमानाच्या इतर यंत्रणांवर ताण येतो आणि विमानाचे संचालन अवघड होते. वैमानिकांना हा तांत्रिक बिघाड लक्षात येताच त्यांनी लँडिंग करण्याचे ठरवले. परंतु विमान इंधनाने पूर्ण लोडेड होते, जे लँडिंगच्या प्रोटोकोलनुसार कमी करणे गरजेचे होते. त्यामुळे वैमानिकांनी विमान काही काळ घिरट्या मारत इंधन कमी केले आणि अखेर सुरक्षित लँडिंग केले.
जगभर कौतुक
या घटनेमुळे मैत्रेयी शितोळेचे धैर्य आणि तांत्रिक कौशल्याचे कौतुक जगभरातून होत आहे. तिने अतिशय तणावाच्या परिस्थितीत धीराने आणि कौशल्याने घेतलेले निर्णय १४० प्रवाशांच्या जीवनात नवीन श्वास देणारे ठरले.