iPhone 17 features and specifications: टेक्नॉलॉजी क्षेत्रातील दिग्गज कंपनी Apple आपली पुढील पिढीची iPhone 17 मालिका 2025 च्या सप्टेंबर महिन्यात बाजारात सादर करण्याच्या तयारीत आहे. Haitong International Tech Research चे प्रसिद्ध विश्लेषक Jeff Pu यांच्या अहवालानुसार, iPhone 17 Pro मॉडेल्समध्ये विशेषत: कॅमेरा आणि कार्यक्षमतेच्या दृष्टीने मोठे बदल होणार आहेत.
कॅमेरा अपग्रेड:
MacRumors च्या अहवालानुसार, आयफोन 17 प्रो आणि iPhone 17 Pro Max या दोन्ही मॉडेल्समध्ये 48MP चा नवीन टेलिफोटो कॅमेरा असणार आहे. हा कॅमेरा आयफोन 16 प्रो मध्ये दिलेल्या 12MP टेलिफोटो कॅमेऱ्याच्या तुलनेत मोठी सुधारणा ठरेल. तसेच, सेल्फी कॅमेर्यालाही अपग्रेड मिळेल आणि तो 12MP क्षमतेचा असणार आहे, ज्यामुळे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलचा अनुभव अधिक चांगला होईल.
रॅम आणि परफॉर्मन्स सुधारणा:
आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्स दोन्ही मॉडेल्समध्ये 12GB RAM असेल, जो सध्याच्या आयफोन 16 प्रोच्या 8GB RAM पेक्षा अधिक असेल. या अपग्रेडमुळे मल्टीटास्किंग आणि AI आधारित फिचर्स अधिक प्रभावीपणे कार्य करू शकतील. याशिवाय, प्रो मॅक्स मॉडेलमध्ये "मेटालेन्स" तंत्रज्ञानावर आधारित छोटा Face ID सेन्सर असेल, ज्यामुळे Dynamic Island आणखी अरुंद होण्याची शक्यता आहे.
स्क्रीन आणि प्रोसेसर:
स्क्रीनच्या आकारात कोणताही बदल अपेक्षित नाही. आयफोन 17 प्रोमध्ये 6.3-इंच स्क्रीन असेल, तर प्रो मॅक्स 6.9-इंच डिस्प्ले घेऊन येईल. दोन्ही मॉडेल्स TSMC च्या प्रगत 3nm तंत्रज्ञानावर आधारित A19 Pro चिपवर कार्य करतील, ज्यामुळे फोनची कार्यक्षमता आणि ऊर्जा-व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल.
आयफोन 17 एअर – नवीन मॉडेलची एन्ट्री:
या मालिकेत एक नवीन iPhone 17 Air किंवा iPhone 17 Slim नावाचे मॉडेलही लॉन्च होण्याची शक्यता आहे, जे सध्याच्या iPhone Plus मॉडेलला रिप्लेस करेल. या मॉडेलमध्ये 6.6-इंचाचा डिस्प्ले, 8GB RAM, आणि आयफोन 17 प्रमाणेच A19 चिप असेल.
याशिवाय, आयफोन 17 एअरमध्ये Apple चा पहिला इन-हाउस 5G मॉडेम असण्याची शक्यता आहे. यात 48MP मुख्य कॅमेरा आणि 24MP फ्रंट कॅमेरा दिला जाईल. डिझाइनच्या दृष्टीने, हा फोन पातळ शरीर आणि अल्युमिनियम फ्रेमसह उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे तो हलका आणि आकर्षक दिसेल.
Apple कडून केले जाणारे हे अपग्रेड्स त्याच्या वापरकर्त्यांना एक नवीन अनुभव देतील आणि स्पर्धात्मक बाजारात कंपनीची पकड आणखी मजबूत करतील. आयफोनप्रेमींना आता 2025 पर्यंत(iPhone 17 launch date) प्रतीक्षा करावी लागेल, पण या अफवांनी आधीच उत्सुकता वाढवली आहे.