Russia fines Google: ..रशियाने गूगलवर मोठा दंड ठोठावला आहे कारण गूगलने क्रेमलिन समर्थक आणि सरकारी मीडिया अकाउंट्स पुन्हा चालू करण्यास नकार दिला आहे. 2020 पासून हे दंड वाढत चालले आहे आणि आता ते सुमारे 2 अनडेसिलियन रुबल्सपर्यंत पोहोचले आहे. मॉस्को टाइम्सने आरबीसी न्यूजच्या हवाल्याने सांगितले आहे की, 2020 पासून गूगलवर दररोज 100,000 रुबल्स (सुमारे 87 हजार रुपये) दंड वाढत गेला आहे, कारण सरकार समर्थक मीडिया आउटलेट्स झारग्रेड आणि RIA FAN चे यूट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले होते. गूगलला कोर्टात पराभव पत्करावा लागल्यानंतर हे दंड लागायला सुरुवात झाली होती.(YouTube blocks Russian media)
Kremlin-backed media accounts

गेल्या काही वर्षांत, दररोजचा दंड दर आठवड्याला दुप्पट होत गेला, ज्यामुळे एकूण दंडाची रक्कम अनडेसिलियनपर्यंत पोहोचली आहे. "अनडेसिलियन" ही संख्या एक मोठा आकडा आहे, ज्यामध्ये 1 अनडेसिलियनला 36 शून्ये लागतात. 1,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000,000 ही संख्या. अंदाजे सांगायचे झाले तर, हे पृथ्वीवरील एकूण पैशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे. 2023 मध्ये गूगलच्या पॅरेंट कंपनी अल्फाबेटचा महसूल 307 बिलियन डॉलर होता, परंतु तरीही अल्फाबेटला हा प्रचंड दंड भरता येणार नाही.

 
सूत्रांच्या माहितीनुसार, एकूण 17 रशियन टीव्ही चॅनेल्सनी गूगलविरुद्ध कायदेशीर दावे दाखल केले आहेत, ज्यात सरकारी चॅनेल वन(Russian government media), सैन्याशी संबंधित झ्वेज्दा ब्रॉडकास्टर आणि RT च्या मुख्य संपादक मार्गारीटा सिमोनियनचे प्रतिनिधित्व करणारी एक कंपनी सामील आहे.(Russian TV channels sue Google) यूट्यूबने विविध रशियन सरकारी मीडिया आउटलेट्स ब्लॉक केल्यावर, मॉस्कोमधील अधिकाऱ्यांनी गूगलवर प्रत्युत्तर म्हणून दंड लावला, परंतु वेबसाइटवर मात्र ब्लॉक केला नाही.(Tsargrad YouTube block)

Google Russia penalty: रशिया-युक्रेन युद्धामुळे पश्चिमी देशांनी लादलेल्या निर्बंधांचे पालन करताना अल्फाबेट इन्कच्या गूगलने आधीच रशियातील जाहिरातींवर बंदी आणली आहे. 2022 मध्ये गूगलची रशियातील सहाय्यक कंपनी दिवाळखोरीत निघाली होती, ज्यामुळे कंपनीला अधिकृतपणे दिवाळखोर घोषित करण्यात आले होते.