Earthquake In Japan: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्तर-मध्य जपानमध्ये ७.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. अहवालानुसार भूकंपानंतर जपानच्या काही प्रदेशांना सुनामीचा इशारा देण्यात आला होता.
किनारी भागासाठी सुनामीचा इशारा

जपानी हवामान संस्थेने इशिकावा, निगाता आणि तोयामा प्रांताच्या किनारपट्टीच्या भागांसाठी सुनामीचा इशारा जारी केला आहे. वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू निगाता प्रांतातील काशीवाजाकी शहरापासून 40 सेंटीमीटर अंतरावर होता. भूकंप स्थानिक वेळेनुसार दुपारी 4:10 च्या सुमारास जपानच्या अॅनामिझूच्या ईशान्येस 42 किलोमीटर अंतरावर झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती. या भूकंपामुळे टोकियोतील इमारती हादरल्या. त्सुनामीच्या चेतावणी दरम्यान, जपानच्या होकुरिकू इलेक्ट्रिक पॉवरने सांगितले की ते त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये कोणत्याही अनियमिततेची तपासणी करत आहेत.

गुरुवारी जपानमध्येही दोन भूकंप झाले. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी होती, तर दुसऱ्या भूकंपाची तीव्रता 5.0 इतकी होती. हवामान खात्याने सांगितले की, इशिकावा प्रांतातील नोटोच्या किनार्‍याजवळ 5 मीटर उंच सुनामी वेगाने येत आहे.

नुकसानीचे कोणतेही वृत्त नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इशिकावा प्रांतातील वाजिमा शहराच्या किनाऱ्यावर 1 मीटरपेक्षा जास्त लाटा उसळल्याचे दिसून आले. सध्या भूकंपामुळे कुठलीही हानी झाल्याची माहिती नाही.