लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचे बऱ्याच घटना स्त्रियांच्या बाबतीत समोर येतात मात्र उत्तर प्रदेशात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. नवविवाहितेनं मधुचंद्राच्या रात्रीच घरातून घरातून पळ काढल्याची घटना घडली आहे. या घटनेने नवरा आणि सासरच्यांना धक्का बसला आहे. सर्वत्र शोध घेतल्यानंतर नवरकडील लोकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
लग्नाचं आमिष दाखवून फसवल्याचे, लग्न झाल्यावर हुंड्यापोटी घरातून बाहेर काढल्याचे अनेक प्रकार स्त्रियांच्या बाबतीत घडतात. उत्तर प्रदेशात मात्र वेगळीच घटना घडलीय. लग्न करून घरी घेऊन आलेल्या नवविवाहितेनं मधुचंद्राच्या रात्रीच घरातून पळ काढला व नवरा आणि सासरच्यांना धक्का दिला. या घटनेमुळे नवरा व सासरचे लोक हादरून गेले. बरीच शोधाशोध केल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
सोनभद्र येथील मुलीसोबत कसबा सौंख येथे राहणाऱ्या मुलाचे लग्न मधस्थिने लावून दिले होते. शनिवारी (2 डिसेंबर) सकाळी ही तरुणी आपल्या ताफ्यासह कसबा सौंख येथे आली. मुलगा आणि मुलगी दोघांचे लग्न मंदिरात झाले. लग्नाचे सर्व विधी सुरळीत पार पडले. त्यावेळी मध्यस्थाने काही रक्कमही घेतली होती.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
शनिवारी सायंकाळी त्यांचे लग्न झाल्यानंतर नवविवाहित दाम्पत्य व त्यांचे कुटुंबीय घरी परतले. रात्री ते सर्व झोपले, मात्र रविवारी सकाळी नववधू घरातून बेपत्ता होती. त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तिचा पत्ता लागला नाही. लग्नाच्या नावाखाली गैरप्रकार झाल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. कुटुंबीयांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस ठाण्याचे प्रमुख प्रबल प्रताप सिंग यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना या घटनेची माहिती मिळाली आहे, परंतु अद्याप अधिकृत लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. रीतसर तक्रार दाखल झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मात्र, पोलिसांनी तपास सुरू केला आहे. लग्न लावण्यासाठी जबाबदार असलेल्या मध्यस्थाला मुलाच्या कुटुंबीयांनी बोलावले आहे. मध्यस्थाच्या बाजूने जबरदस्ती झाली होती का? किंवा मुलीच्या लोकांनी फसवणूक केली का?, याचा पोलिस शोध घेत आहेत. ते अधिक तपशिलांच्या प्रतीक्षेत आहेत आणि अद्याप बेपत्ता वधूचा शोध लागलेला नाही. ती सापडली तर या प्रकरणातील अनेक पैलू स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now