दोन दिवसांपूर्वी रवींद्र बेर्डे(Ravindra Berde) यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले. दिवंगत अभिनेते रवींद्र बेर्डे हे लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी अभिनेता लक्ष्मीकांत यांच्या सोबत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले होते.
1965 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी रवींद्र रंगभूमीशी जोडले गेले आणि त्यांनी 300 हून अधिक मराठी चित्रपट आणि सुमारे पाच हिंदी चित्रपटांमध्ये योगदान दिले, ज्यात "चंगू मांगू," "एक गाडी बाकी अनाडी," "हाच सुनबाईचा भाऊ, ""खतरनाक," "हमाल दे धमाल," "थरथरट," "उचला रे उचला," अश्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रवींद्र बेर्डे हे मराठी मनोरंजन क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते होते. अशोक सराफ, विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे, सुधीर जोशी आणि भरत जाधव यांसारख्या अभिनेत्यांसोबत त्यांनी उत्तम काम केलं आहे. त्यांनी विविध भूमिका साकारल्या आणि मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडली. ‘सिंघम’ आणि ‘चिंगी’ या हिंदी चित्रपटांतून रवींद्र बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याची जादू दाखवली.
1995 मध्ये 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकाच्या वेळी रवींद्र बेर्डे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर 2011 मध्ये ते कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले होते. मात्र, तब्येत ढासळत असतानाही त्यांनी रंगभूमीची आवड सोडली नाही. कॅन्सरशी झुंज देत असतानाही त्यांनी नाटकं पाहणं सुरूच ठेवलं आणि या आव्हानांना तोंड देण्याचं धैर्य दाखवलं.
रवींद्र बेर्डे यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे लक्ष्मीकांत बेर्डे हे सख्खे भाऊ होते. दरम्यान, त्यांचे पुरुषोत्तम बेर्डे हे चुलत भाऊ हे देखील मराठी मनोरंजन उद्योगातील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. रवींद्र बेर्डे यांनी गेल्या काही दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रापासून दुरावले होते. त्यांच्या जाण्याने मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातूनही लोक आपली व्यथा मांडत आहेत.
रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचे सख्खे भाऊ लक्ष्मीकांत बेर्डे होते. तर चुलत भाऊ हेदेखील मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. रवींद्र बेर्डे गेल्या काही दिवसांपासून मनोरंजनसृष्टीपासून दूर होते. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहतेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत.