ईशान्य रेल्वे विभागात अप्रेंटिस पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. आपण वेबसाइट ner. Indianrailways.gov.in वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर आहे.
25 नोव्हेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 100 रुपये शुल्क आहे. जर तुम्ही या पदासाठी अर्ज करणार असाल तर तुमच्याकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
केवळ 10वी पासच नाही तर तुमच्याकडे संबंधित आयटीआय ट्रेड सर्टिफिकेटही असायला हवे. या दोन गोष्टींशिवाय तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकत नाही. अर्ज केल्यानंतर, रेल्वेकडून या भरती प्रक्रियेशी संबंधित अपडेट्स वेबसाइटवर पोस्ट केले जातील.