राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार करत घटनास्थळावरून पळ काढला. सुखदेव सिंह गोगामेडी यांना लगेचच रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अजित सिंग हे सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यासोबत होते ते देखील गंभीर जखमी झाले.
जून महिन्यात मध्य प्रदेश मधील इंदूर शहरात करणी सेनेचा आणखी एक कार्यकर्ता कारमध्ये जखमी अवस्थेत सापडला होता. तर इंदूरमधील करणी सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष मोहित पटेल (२७) हे त्यांच्या कारमध्ये कानडीया पोलीस ठाण्याच्या हद्दीत मृतावस्थेत आढळून आले.