महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सरकारी विभागांमधील विविध श्रेणींमध्ये एकूण 842 पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 
एमपीएससीने एका अधिसूचनेद्वारे ही माहिती प्रसिद्ध केली आहे. यामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागात 5, गृह विभागात 10, उच्च व तंत्रशिक्षण विभागात 1, सामान्य प्रशासन विभागात 1, इतर मागासवर्गीय कल्याण विभागात 57, पाणीपुरवठा विभागात 3 आणि वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग 765 पदांचा समावेश आहे.

तुम्ही https://mpsc.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ जानेवारी आहे. या पदांसाठी गट अ आणि गट ब श्रेणींचा समावेश आहे.