TRP List Of Marathi Serials: प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा छोट्या पडद्यावरील मालिका हा विषय असतो. प्रेक्षकांना आपल्या घरातील  एक भाग मालिकेतील अनेक पात्र, कथानक वाटू लागतात. प्रेक्षकांचं आणि मालिकाचं एक वेगळं नातं तयार झालेलं असतं. मालिका दररोज प्रेक्षक न चुकता पाहत असतात. 
मागील आठवड्यात टीआरपीमध्ये कोणत्या मालिकेची घसरण झाली? जाणून घ्या…
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकेचे निर्माते आणि लेखक नवनवीन ट्वीस्टच्या माध्यमातून प्रयत्न करत असतात. मालिकेचा टीआरपी यावरच अवलंबून असतो. टेलीव्हिजन टीआरपी मागील आठवड्याचा समोर आला आहे. ज्यामध्ये जुन्या मालिकेना मागे टाकतं ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेने चांगलीच बाजी मारली आहे.

अभिनेता अक्षर कोठारी आणि अभिनेत्री ईशा केसकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका प्रेक्षकांच्या भेटीस २० नोव्हेंबरपासून आली. या मालिकेत मुर्तीकार कला खरेची भूमिका ईशाने साकारली आहे. बिझनेस मॅन अद्वैत चांदेकरच्या भूमिकेत अक्षय झळकला आहे. प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान अवघ्या काही दिवसांत या मालिकेने निर्माण केलं आहे. त्यामुळे जुन्या मालिकेवर वरचढ झालेली टीआरपीच्या यादीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका पाहायला मिळत आहे.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


 मागील आठवड्याची टेलीव्हिजन टीआरपी यादी मराठी टेल बझ’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर हीच टेलीव्हिजन टीआरपीची यादी ईशा आणि अक्षयने शेअर केली आहे. या यादीमध्ये ‘ठरलं तर मग(Tharala tar Mag)’ ही मालिका पहिल्या स्थानावर असून ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी(Laxmi chya Pavlani)’ ही मालिका दुसऱ्या स्थानावर आहे. यापूर्वी  ‘तुझेच मी गीत गात आहे(Tujhech mi Geet gaat ahe) ’ ही मालिका दुसऱ्या स्थानावर असायची. पण आता ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका आलेल्या कलाने चांगलीच बाजी मारली आहे. ही टीआरपीची यादी पाहता येत्या काळात ईशा केसकरच्या ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ आणि जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकांमध्ये चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

मागील आठवड्याच्या टेलीव्हिजन टॉप १० मालिका
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


१) 'ठरलं तर मग' ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे.
२) दुसऱ्या क्रमांकावर 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' ही मालिका आहे.
३) तर 'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका तिसरा क्रमांक वर पोहोचली आहे.
४) चौथ्या क्रमांकावर 'प्रेमाची गोष्ट(Premachi Gost)' ही मालिका आहे.
५) पाचव्या क्रमांकावर 'आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)' ही मालिका जाऊन पोहोचली आहे.
६) 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे.
७) सातव्या क्रमांकावर 'कुन्या राजाची गं तू राणी' ही मालिका आहे.
८) आठव्या क्रमांकावर सिद्धार्थ जाधवचा 'आता होऊ दे धिंगाणा २' हा शो आहे.
९) तर 'ठिपक्यांची रांगोळी' ही मालिका नवव्या क्रमांकावर आहे.
१०) सर्वात लास्ट म्हणजे दहाव्या क्रमांकावर 'मुरांबा' ही मालिका आहे.
    
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now