मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
सेलिब्रिटी फोटोग्राफर इन्स्टंट बॉलिवूडनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. अंजली तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत गृह प्रवेशाची पूजा करताना या व्हिडीओत दिसली. या व्हिडीओमध्ये तिची आई-वडील घराची पूजा करत असल्याचे पाहायला मिळते. तर काही नातेवाईक देखील त्यांच्यासोबत आहेत. अंजलीच्या आयुष्यातील ही इतकी मोठी गोष्ट असली तरी तिने मात्र खूप साधारण ड्रेस परिधान केला आहे. कॉटन चा ड्रेस तिनं परिधान केला आहे. अंजलीचा लूक नो मेकअप आणि मोकळे केस असा आहे. तिच्या आलिशान घराणं सगळ्यांचं लक्ष वेधला आहे. तर नेटकरी विविध कमेंट त्यावर करत आहेत.
अनेकांनी या वायरल व्हिडिओवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'नवीन घराच्या शुभेच्छा' असे एक नेटकरी कमेंट करत म्हणाला. 'नविन घर घेणं इतक्या कमी वयात सोपी गोष्ट नाही. खूप खूप शुभेच्छा.' असे दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं. तिला काही नेटकऱ्यांनी ट्रोल केला आहे. 'इतके पैसे कुठून आले' असे एक नेटकरी कमेंट करत म्हणाला. 'ही काय काम करते ज्यातून इतके पैसे मिळतात' असे दुसरा नेटकरी म्हणाला. 'कच्चा बदाम पक्क गया' असे तिसरा नेटकरी म्हणाला. 'यांच्याकडे इतके पैसे येतात कुठून.' असे आणखी एक नेटकरी म्हणाला.
वाचा पुढील बातमी - ‘मोये मोये’ चा नेमका अर्थ काय? सध्या खूप गाजत आहे हे गाणं
दरम्यान, सोशल मीडियावर अंजली अरोरा ही चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर अंजली नेहमीच पोस्ट शेअर करताना दिसते. इतकंच नाही तर जेव्हा एमएमएस अंजलीचा लीक झाला होता. तेव्हा चांगलीच चर्चेत ती आली होती. या शिवाय कंगना रणौतच्या लॉक अप या शोमध्ये ती कच्चा बादाम या गाण्याला लोकप्रियता मिळाल्यानंतर दिसली होती. मुन्नवर फारुकीसोबत असलेल्या नात्यावरून त्या शोमध्ये ती चर्चेत आली होती.