'Zimma 2': २४ नोव्हेंबर रोजी मराठी चित्रपट ‘झिम्मा’चा दुसरा भाग प्रदर्शित झाला. दिग्दर्शक हेमंत ढोमेने ‘झिम्मा’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर दुसऱ्या भागाची घोषणा केली होती. प्रेक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद ‘झिम्मा २’ ला मिळत आहे. प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
सिनेमागृहात चित्रपटाने यशस्वीरित्या आठवडा पूर्ण केला आहे. सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, सिद्धार्थ चांदेकर, सोनाली कुलकर्णी,क्षिती जोग, मृण्मयी गोडबोले, सायली संजीव हे कलाकार ‘झिम्मा(Jhimma)’मध्ये होते. आधीचेच सर्व कलाकार तर ‘झिम्मा २’मध्ये आहेत. फक्त शिवानी सुर्वे, रिंकू राजगुरू यांना सोनाली कुलकर्णी व मृण्मयी गोडबोले यांच्या जागी घेण्यात आलं आहे. रिंकूने या चित्रपटाबद्दल केलेल्या पोस्टने लक्ष वेधलं आहे.
या टीममधील सर्वांबरोबर फोटो रिंकूने शेअर केले आहेत. "मी काय बोलू यांच्याबद्दल, मला आजवर कधी जाणवलं नाही की, या प्रवासात मी नवीन आहे. मी आपली इवलुशी या सगळ्यांसमोर, पण या सगळ्यांनी अगदी अलगदपणे इवलुश्या जिवाला सामावून घेतलं आपलंसं केलं.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
या प्रवासात तुम्हा सर्वांकडून खुप शिकले आहे. खुप सुंदर गोष्टी अनुभवायला मिळाल्या. रिंकूने फोटो शेअर करत खाली कॅप्शन देत म्हणाली की,या सगळ्यासाठी सर्वांना खूप खूप थँक्यू. खूप प्रेम. हेमंत दादा थँक्यू तू मला ही संधी दिलीस,”
चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव रिंकूच्या या पोस्टवर केला आहे. हेमंत ढोमे, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर यांनी रेड हार्ट इमोजी कमेंट केले आहेत. (Jhimma 2 Movie)
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now