Shah Rukh Khan's Dunki Trailer Out:
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या त्याच्या ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची गाणी आणि टीझर रिलीज झाल्यानंतर आता प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत.
या दोन्ही गाण्यांना आणि चित्रपटाच्या टीझरला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी आता ‘डंकी’चा ट्रेलर रिलीज केला आहे.

 काल सोशल मीडियावर फक्त 'डंकी'च्या ट्रेलरचीच चर्चा सुरू झाली. आणि सध्या सोशल मीडियावर 'डंकी' ट्रेंड होत आहे. अखेर शाहरुखच्या ‘डंकी’ चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.