लग्न मोडल्याने निराश होऊन वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली. या घटनेने केरळमध्ये खळबळ उडाली आहे. शहाना (२६) असे या डॉक्टरचे नाव असून ती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्जिकल विभागात शिकत होती. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी या परिस्थितीची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
कौटुंबिक वादानंतर, पोलिसांनी डॉ. ई.ए. रुवैस याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि हुंडा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डॉ. शहानाची आई आणि दोन भाऊ तिच्यासोबत राहत होते. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. धक्कादायक बाब म्हणजे शहानाचे रुवैससोबत संबंध होते आणि काही दिवसात तिने त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर रुवैसच्या कुटुंबीयांनी शहानाच्या कुटुंबाकडे बीएमडब्ल्यू कार, 15 एकर जमीन आणि 15 तोळे सोन्याची मागणी केली होती. शहानाच्या कुटुंबीयांनी खुलासा केला की रुवैसच्या कुटुंबाच्या मागण्या पूर्ण करणे शक्य नव्हते, त्यामुळे त्यांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. यामुळे हताश झालेल्या शहानाने स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. तिच्या अपार्टमेंटमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले की, "प्रत्येकाला फक्त पैशांची गरज आहे."
वाचा पुढील बातमी -
या प्रकरणाची केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली असून, राज्याच्या महिला व बालविकास विभागाला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पसंख्याक आयोगानेही या प्रकरणी चिंता व्यक्त केली आहे. समितीचे अध्यक्ष ए.ए. रशीद यांच्यासह जिल्हाधिकारी, शहर पोलीस आयुक्त आणि वैद्यकीय संचालक 14 डिसेंबर रोजी आयोगासमोर सविस्तर माहिती देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
वाचा पुढील बातमी -