Ajay Devgn Injured Singham Again Shooting: 'सिंघम अगेन' या चित्रपटातील सहभागामुळे बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्तिमत्व अजय देवगण चर्चेत आहे. 'सिंघम'चे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमा चाहते आतुरतेने रिलीज होण्याची वाट पाहत आहे. दुर्दैवाने, अजय देवगणला या चित्रपटाच्या अॅक्शन सीक्वेन्सच्या चित्रीकरणादरम्यान दुखापत झाली. 

Ajay Devgn injured during an action sequence of the movie Singham Again
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन'च्या शूटिंगमध्ये मग्न असलेला अजय देवगण या चित्रपटाच्या अॅक्शन सीनचे चित्रीकरण करत असताना त्याला गंभीर दुखापत झाली.

मुंबईतील विलेपार्ले या गजबजलेल्या  परिसरामध्ये प्रसिद्ध बॉलीवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि त्याची टीम सध्या त्यांच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. एका अ‍ॅक्शन सीनच्या शूटिंगदरम्यान अजयच्या डोळ्याला दुखापत झाली. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आले आहे की अजय देवगणला एका लढाईच्या सीक्‍वेन्सचे शूटिंग करताना दुखापत झाली आणि त्यामुळे त्याच्या डोळ्यांना इजा झाली.

शो मस्ट गो ऑन' असं म्हणत शूटिंग पूर्ण केलं
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗


मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सिंघम अगेन'च्या चित्रीकरणादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे अजय देवगणने काही वेळ ब्रेक होता. सेटवर त्याने वैद्यकीय उपचार घेतले. दरम्यान, दिग्दर्शक रोहित शेट्टीने खलनायकां भोवती केंद्रित काही दृश्यांचे शूटिंग पूर्ण केले. कामाला प्राधान्य दिल्याबद्दल अजय देवगणचे कौतुक करण्यात आले. याव्यतिरिक्त, या वेळी, त्याने 'द शो मस्ट गो ऑन' असं म्हणत अर्धे शूटिंग पूर्ण केले.


रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन'चे चित्रीकरण गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या चित्रपटात अजय सिंग, करीना कपूर खान आणि दीपिका पदुकोण यांच्यासोबत अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 'सिंघम अगेन' ची घोषणा झाल्यापासून चित्रपट रसिक त्याच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.