उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. नैनिताल महामार्गावर कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली, परिणामी दोन्ही वाहनांना आग लागली. दुर्दैवाने, अपघातानंतर कारमधील सर्व प्रवासी दुःखद रीतीने जिवंत जाळले गेले. अहवालानुसार 8 जणांचा मृत्यू झाला आहे. याला एसएसपी (वरिष्ठ पोलीस अधीक्षक) यांनीही दुजोरा दिला आहे.
बरेली येथील एसएसपी घुले सुशील चंद्रभान यांनी माहिती दिली की, महामार्गावर कार एका ट्रकला धडकली, ज्यामुळे कारला आग लागली. कार आतून लॉक करण्यात आली होती, ज्यामुळे कार मधील लोकांना बाहेर पडता आलं नाही, परिणामी त्यांचा जळून मृत्यू झाला. कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत; त्यापैकी 7 प्रौढ आणि एक बालक आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
बरेली जिल्ह्यातील भोजीपुरा पोलीस स्टेशन परिसरात नैनिताल महामार्गावर रात्री उशिरा अपघात झाला. सर्व मृतक बहेडी येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, कारचा टायर फुटल्यानंतर कार ट्रकवर आदळली. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.