'भूल भुलैया 3' बद्दल एक मोठे अपडेट मिळत असून निर्मात्यांनी मार्चमध्ये त्याचा सिक्वेल जाहीर केला होता.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
आता, बॉलीवूड रिपोर्ट्सनुसार, तिसरा भाग दिवाळी 2024 मध्ये रिलीज होणार आहे. 'भूल भुलैया 2' हा चित्रपट 2007 मध्ये अक्षय कुमार स्टारर 'भूल भुलैया' चा सिक्वेल होता. 'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिकने राजाची भूमिका साकारली होती, तर तब्बूची दुहेरी भूमिका होती.
वाचा पुढील बातमी - 'अॅनिमल' चित्रपटात रणबीर कपूरसोबत इंटिमेट सीन करणारी अभिनेत्री तृप्ती डिमरी कोण आहे घ्या जाणून
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो 'चंदू चॅम्पियन'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट कबीर खान दिग्दर्शित करणार असून मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित आहे. मुरलीकांत पेटकर या पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्याने 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो.