भारतीय संघ क्रिकेट इतिहासात चौथ्यांदा एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहचला. सेमी फायनल सामना न्यूझीलंडविरुद्धच्या शानदार विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाला शुभेच्छा देणारे पंतप्रधान मोदी हे क्रिकेट चाहते आहेत.
"टीम इंडियाचे(Team India) अभिनंदन! भारतीय संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आणि उल्लेखनीय शैलीत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अप्रतिम फलंदाजी आणि चांगल्या गोलंदाजीने आमच्या संघाने सामना जिंकला. फायनलसाठी शुभेच्छा!" असे ट्विट त्यांनी बुधवारी X वर शेअर केले.
पीएम मोदींनी(PM Modi Cricket) सोशल मीडियावर मोहम्मद शमीच्या कामगिरीचेही कौतुक केले. "आजचा सेमी-फायनल हा आणखीनच खास ठरला आहे. वैयक्तिक कामगिरीमुळेही. मोहम्मद शमीने या सामन्यात आणि विश्वचषकात केलेली गोलंदाजी क्रिकेटप्रेमींना आवडेल. शमीने चांगला खेळ केला!" असे मोदींनी ट्विट केले. मोहम्मद शमीने 7 गडी बाद करत भारताला विजय मिळवून देत न्यूझीलंडचे आव्हान संपुष्टात आणले. न्युझीलँड विरुद्ध मोहम्मद शमीने 57 धावांत 7 बळी घेत भारताला विजय मिळवून दिला आणि 33 वर्षीय शमीने केवळ 17 सामन्यांत 50 बळी पूर्ण केले.