विद्यापीठांमध्ये सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ संशोधन फेलोशिपच्या भरतीसाठी यूजीसी-नेटच्या अभ्यासक्रमातील बदलांसाठी गठित समितीच्या अहवाल आल्यानंतर मोठे बदल केले जाणार आहेत. काही नवीन विषयांचाही समावेश UGC NET परीक्षेत केला जाऊ शकतो.
UGC चे अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत स्थापन करण्यात येणारी समिती यूजीसी नेटच्या प्रत्येक बाबी तपासणार आहे. कोणत्याही विषयात पेपर ऍड येईल का, याचासुद्धा अहवाल समिती देणार आहे. या समितीचा अहवाल आल्यावर यूजीसी निर्णय घेणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर कौशल्य अभ्यासक्रमांना सुद्धा बहुविद्याशाखीय शिक्षणासोबतच महत्त्व देण्यात येत आहे, आणि याच मुळे UGC नेटचे विषय तश्याच पद्धतीने बदल करावे लागणार आहेत.