ugc net date sheet december 2023: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने डिसेंबर महिन्यात म्हणजेच पुढच्या महिन्यात होणाऱ्या UGC NET परीक्षेचे विषयानुसार वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षा केंद्र आणि परीक्षा शहर याबाबतचे अधिसूचना परीक्षेच्या अगोदर दहा दिवस(ugc net admit card 2023) देण्यात येणार आहे ही माहिती अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in यावर देण्यात येईल. परीक्षेला बसलेले उमेदवार अधिकृत संकेतस्थळ nta.ac.in (ugc net official website) यावर जाऊन आपले तपशीलवार वेळापत्रक पाहू शकतात.

UGC NET December 2023 Timetable: विषयवार परीक्षा वेळापत्रक

 6 डिसेंबर रोजी इंग्रजी व इतिहास या दोन विषयांच्या परीक्षा अनुक्रमे शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 मध्ये घेण्यात येणार आहे. 7 डिसेंबर रोजी 1 शिफ्टमध्ये वाणिज्य विषयाची परीक्षा तर 2 शिफ्टमध्ये कंप्यूटर साइंस और एप्लीकेशन यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. आठ डिसेंबर रोजी लोकप्रशासन आणि तत्वज्ञान या विषयाचे एक्झाम शिफ्ट दोन मध्ये घेण्यात येईल तर शिफ्ट 2 मध्ये हिंदी या विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. हिंदी विषयाची परीक्षा 11 डिसेंबर रोजी होणार आहे. तर राज्यशास्त्र विषयाची परीक्षा 11 डिसेंबर रोजीच शिफ्ट एक मध्ये घेण्यात येणार आहे. भूगोल, समाजशास्त्र आणि जनसंवाद या विषयांची परीक्षा १२ डिसेंबर रोजी होणार आहे. 

तपशीलवार परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Examination Schedule of UGC - NET December 2023.PDF


UGC NET चा RESULT कधी लागेल?

UGC NET डिसेंबर 2023 साठी लेखी परीक्षा 6 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत घेतली जाईल. परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार असून पहिली शिफ्ट सकाळी 9 ते दुपारी 12 वाजे पर्यंत आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते 6 वाजे पर्यंत असेल. या परीक्षेचा निकाल 10 जानेवारी 2024 रोजी निकाल जाहीर होईल.

'ज्युनियर रिसर्च फेलोशिप' आणि 'असिस्टंट प्रोफेसर' 83 विषयांमध्ये पात्रतेसाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) द्वारे UGC NET डिसेंबर 2023 आयोजित केली जात आहे. उमेदवारांना NTA वेबसाइट nta.ac.in किंवा UGC NET वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर नियमितपणे भेट देण्याचा सल्ला दिला जातो.