जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

TIGER 3: सर्वात जास्त कमाई 'येथे' होते मात्र 'टायगर ३' वर बंदी; सलमान खानचं वाढल टेन्शन

Tiger 3 Ban Islamic State: अभिनेता सलमान खान याचा आगामी चित्रपट टायगर 3(Tiger 3 Movie) या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 
Tiger 3 Banned in 3 Country

मात्र सलमानच्या या देशात राहणाऱ्या फॅन्स ना सलमानचा हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहता येणार नाही. सलमानचे चाहते केवळ भारतातच नाही तर परदेशातही आहेत. आणि ते प्रदेशातील चाहते हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची वाट पाहत होते.  

सलमान खानची चाहते जगातल्या सर्व इस्लामिक देशांमध्ये आहेत. मात्र आलेल्या बातमीनुसार तीन आखाती देशा मधल्या त्याच्या चाहत्यांसाठी ही वाईट बातमी आहे. कारण सलमान खानच्या tiger 3 या चित्रपटावर या तीन आखाती देशांमध्ये बंदी घालण्यात आले आहे. गेल्यावर्षी प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा(Akshay Kumar) चित्रपट सम्राट पृथ्वीराज यावरही इस्लामिक देशांनी बंदी घातली होती. आणि या बंदीमुळे इस्लामिक देशातील त्यांच्या चाहत्यांना चित्रपट पाहता आला नव्हता. आणि आता सलमान खानच्या टायगर तीनवर देखील याच देशांनी बंदी घातली आहे.(Tiger 3 Banned)

टायगर तीन (saman Khan latest movie) या चित्रपटावर बंदी घातलेल्या देशांमध्ये कुवेत, कतार आणि ओमान या देशांची नावे आहेत. वृत्तानुसार टायगर तीन वर बंदी घालण्या मागचं कारण या चित्रपटातील दृश्य तुर्की रशिया व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये शूट करण्यात आले आहेत. सलमान खान या चित्रपटामध्ये जागतिक दहशतवादी संघटनेची लढताना दाखवण्यात आला असून यातील पात्र ही इस्लामिक देशांशी संबंधित आहेत. - कुवेत ओमान आणि कतार या देशाने बंदी याच कारणामुळे घातले असल्याची माहिती मिळत आहे कारण इस्लामिक देशातील लोकांचं नकारात्मक चित्रण या चित्रपटात दाखवण्यात आल आहे. चित्रपटांमध्ये पाकिस्तान विरुद्ध टायगर असा लढा दाखवण्यात आला आहे. मात्र जगात या चित्रपटांमधून दहशतवाद हा या देशांमधून होतो असं दिसत असून यामुळे काही देशांच्या नाराजीचे कारण असल्याचं माहिती मिळत आहे. 

टायगर तीन (Tiger 3 movie Review) वर बंदी घालण्यात आल्याची माहिती मिळाली असली तरी चित्रपटाची निर्माते आणि दिग्दर्शकांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र या इस्लामिक देशांमध्ये घातलेल्या बंदीमुळे टायगर 3 च्या बाहेरील देशांवरील कलेक्शन वर परिणाम होण्याचे शक्यता वर्तवण्यात येत आहे. बॉलीवूड मधील चित्रपटांना चांगली कमाई करण्याचे महत्त्वाचे बाजारपेठ म्हणजे आकाती देश असल्याची माहिती मिळते. मात्र टायगर तीन वर घातलेल्या बंदीमुळे त्यांच्या कलेक्शन वर परिणाम होणार असल्याचे कळत आहे. सलमान खान स्टारर टायगर तीन हा चित्रपट दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर जगभरात प्रदर्शित होणार आहे. 12 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या