SET 2024: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामार्फत महाराष्ट्र आणि गोव्यामधील विद्यापीठांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदासाठी पात्रता निश्चित करता यावी म्हणून यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, कायदा, सामाजिक विज्ञान, व्यवस्थापन शिक्षण आणि शारीरिक शिक्षण यासारख्या विद्याशाखांच्या अंतर्गत सेट परीक्षा घेतली जाते.
2024 करिता महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच सेट याची अर्ज प्रक्रिया काहीच दिवसांमध्ये सुरू होईल. याबद्दलचे अधिकृत जाहिरात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाईटवर भरायचा आहे. 

काय आहेत पात्रता निकष?

- सेटला जो विषय ठेवायचा आहे त्या विषयांमधून उमेदवाराकडे यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे पदव्युत्तर पदवी आवश्यक.

- पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये किमान 55% गुण मिळवले पाहिजेत तरच आपण SET या परीक्षेसाठी पात्र असाल.

- एससी/एसटी/तृतीयपंथी/पीडब्लूडी / अनाथ आणि ओबीसी/एसबीसी/डीटी (व्हिजे)/एनटी (नॉन-क्रिमी लेयर यांना पदव्युत्तर पदवी परीक्षेमध्ये किमान 50 टक्के गुण हवेत.

- 4 सेमिस्टर किंवा दोन वर्षाच्या पदवी तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात किंवा पहिल्या दोन सत्रात शिकत असलेले उमेदवार किंवा पाच वर्षाच्या एकात्मिक पदव्युत्तर अभ्यासक्रम असलेल्या चौथ्या वर्षात शिकत असलेली उमेदवार या परीक्षेला बसण्यासाठी पात्र नाहीत

- SET परीक्षेला बसण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही.

Exam Highlights

परीक्षा पातळी: राज्य
परीक्षा पद्धत : ऑफलाइन
परीक्षेची वारंवारता : वर्षामधून एकदा
परीक्षेचा कालावधी : 120 मिनिटे
विषय पेपर 1: अध्यापन आणि संशोधन योग्यता
पेपर 2: 32 विषय
परीक्षा शुल्क : सर्वसाधारण वर्गासाठी ₹ 850
आरक्षित वर्गासाठी: ₹ 650
अधिकृत संकेतस्थळ : https://setexam.unipune.ac.in

SET गुणदान योजना कशी असते?

SET या परीक्षेमध्ये दोन पेपर असतात. या दोन्ही पेपर मध्ये एम सी क्यू टाईप म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न विचारलेले असतात. परीक्षेच्या एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ब्रेक न घेता परीक्षा घेतली जाते. पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपर मध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी दोन गुण दिले जातात. या परीक्षेमध्ये नकारात्मक मार्किंग म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग नसते त्यामुळे उत्तरे चुकल्यास ज्यादा चे गुण कमी होत नाहीत.

सत्र एक मध्ये 50 प्रश्न असतात यासाठी गुण शंभर असतात तर हा पेपर सोडवण्यासाठी आपल्याला वेळ एक तासाचा मिळतो सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये हा पेपर घेण्यात येतो. द्वितीय सत्रामध्ये 100 प्रश्न असतात आणि 200 गुणांसाठी ही परीक्षा घेण्यात येते याला दोन तास वेळ देण्यात येतो ही परीक्षा सकाळी साडेअकरा ते दुपारी दीड पर्यंत घेण्यात येते.

SET Syllabus (अभ्यासक्रम)

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा ही यूजीसी नेट आणि यूजीसीसीएसआयआर नेट या दोन्ही परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित घेतली जाते या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहण्यासाठी https://setexam.unipune.ac.in या अधिकृत वेबसाईटवर आपण चेक करू शकता.