जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Sarkari Nokri: 8 महिन्यांमध्ये 'MPSC'ची 21 हजार पदभरती

mpsc time table 2024-25: MPSC ने रखडलेल्या भरती प्रक्रियेला तब्बल 21 हजार पदांची मेगा भरती घेत वेग दिला. एमपीएससी मधील बहुतांश पदांच्या जाहिराती आता निघाले असून येथे आठ महिन्यांमध्ये या भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 
21 thousand posts of 'MPSC' in 8 months

राज्य सरकार संबंधित विभागाकडून जागा भरण्यासाठी जसजसे मागणी पत्र येतील. तसतसे लोकसेवा आयोग भरती प्रक्रिया राबवते. मागील वर्षभरामध्ये राजपत्रित अ आणि ब व अराजपत्रित ब गट लिपिक पदाच्या भरती करता 21000 पदे भरता यावे त्यासाठी राज्य सरकार मधील विविध विभागाकडून मागणी करण्यात आली होती. आता या पदांच्या भरती प्रक्रिया वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. -

पुढील आठ महिन्यांमध्ये ही भरती प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी माहिती आयोगाचे प्रभारी अध्यक्ष डॉक्टर दिलीप पांढरपट्टे यांनी एका मीडियाला दिली. तब्बल आठ हजार रुपये लिपिक पदाची असून अ गटापैकी वैद्यकीय शिक्षण विभागातील सर्वात जास्त 2000 पदे आहेत. डिसेंबर पर्यंत यात आणखी पदांचे भरती ऍड होणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात आयोगाकडून कधीच भरती प्रक्रिया राबवली नव्हती. पदभरती नसल्यामुळे उमेदीचे वर्ष स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात घालवलेल्या लाखो उमेदवारांमध्ये प्रचंड असंतोष होता.





व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या