जिल्हा परिषद मधील वेगवेगळ्या 18 संवर्गातील रिक्त पदे भरता येण्यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 भरती प्रक्रिया राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली होती. दोन्ही जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांकडून 24800 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र ही भरती प्रक्रिया वादग्रस्त ठरल्यामुळे महाभरती रद्द करण्यात आली होती.
आता रद्द करण्यात आलेल्या महाभरती प्रक्रियेचे 51 लाख 65 हजार 62 रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले असून ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या 18 संवर्गातील रिक्त पदे भरता यावेत यासाठी मार्च 2019 आणि ऑगस्ट 2021 मध्ये ही प्रक्रिया सुरू केली होती.
24882 विद्यार्थ्यांनी या पदांसाठी अर्ज केले होते तर 79 लाख 46 हजार 250 परीक्षा शुल्क शासनाकडे जमा आहे. त्यापैकी सध्या 51 लाख 65 हजार 62 रुपये शासनाकडून मंजूर करण्यात आले असून 3662 विद्यार्थ्यांची पहिल्या टप्प्यांमध्ये 11 लाख 37 हजार पाचशे रुपये बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. ग्राम ग्रामविकास विभागाकडून हे परीक्षा शुल्क जिल्हा परिषदेच्या माध्यमातून परत करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.