जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Sangli News: या फळामुळे शेतकरी झाला मालामाल! औषधे कमी उत्पन्न जास्त; दुष्काळात ही हमी?

Sangli Batmya: सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील एक शेतकरी या फळामुळे मालामाल झाला आहे. औषधेही कमी लागतात त्यासोबत  या पिकाला पाणीही कमी लागते त्यासोबत मेंटेनन्स सुद्धा जास्त येत नाही. त्यामुळे खर्च ही कमी आहे.
Dragon Fruit Sangli Farmer

शेतकऱ्याने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीनुसार, औषधाची फवारणी एकदा घेतल्यानंतर पुन्हा एक महिन्यानंतर घेतल्याचे सांगितले. मात्र द्राक्षासारख्या पिकांवर फवारणी घेतल्यानंतर लगेच फवारणी घ्यावे लागतात. तसा त्रास ड्रॅगन फ्रुट या फळाच्या पिकांमध्ये नाही. तसेच हे पीक मानसिक स्वास्थ देखील देते. आर्थिक उत्पन्न देखील जास्त देणार ड्रॅगन फ्रुट(Dragon Fruit) असं पीक आहे. 

ड्रॅगन फ्रुट हे परदेशी पीक आहे मात्र दुष्काळी भागातील शेतकरी देखील ह्या पिकाचे उत्पादन अलीकडच्या काळामध्ये भरपूर प्रमाणात घेत असल्याचे दिसून येत आहे. मागील तीन वर्षांमध्ये सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात 100 एकरच्यावर शेतकऱ्यांनी या पिकाचे उत्पादन घेतल आहे. ड्रॅगन फ्रुटचे पीक शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवून देत आहे.

प्रतापपूर येथील अझरुद्दीन शेख मागील आठ वर्ष ड्रॅगन फ्रुट ची शेती करत आहेत. 2014 पासून दोन वर्षे त्यांनी ड्रॅगन फ्रुट च्या शेतीचा अभ्यास केला. विविध राज्यांमध्ये जाऊन त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटून कशा पद्धतीने शेती केली जाते याची माहिती घेतली. ही माहिती घेत असताना त्यांना बऱ्याच शेतकऱ्यांनी शेती दाखवण्यासाठी पैशाची ही मागणी केल्याचे ते सांगतात. ड्रॅगनची शेती केल्यानंतर त्यांना बऱ्याच लोकांनी टोमणे देखील मारले आहेत. काट्याची शेती केली आहे, अशा पद्धतीचे टोमणे त्यांना ऐकावे लागले आहेत. अशी माहिती त्यांनी बीबीसी न्यूज या वृत्तवाहिनीला देताना सांगितले. हे टोमणे ऐकल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास कमी झाला होता. तरीदेखील त्यांनी शेती करायची सोडली नाही.

आतापर्यंत दुष्काळी भागांमध्ये द्राक्ष, कडधान्य आणि डाळिंबे यासारखी पिके घेतली जात असत. मात्र नैसर्गिक कोपामुळे ही पीक घेणं देखील आता मुश्किल झाल आहे. पिक घेतल्यानंतर सहा महिन्यांमध्ये दुष्काळ पडला तरी हे पीक शेतकऱ्याला तारणार आहे, हे शेख यांना कळून चुकलं. 

या पिकाच्या भावामध्ये बऱ्याच वेळात चढ-उतार आले आहेत कधी दोनशे रुपये तर कधी दीडशे रुपये असा रेट मिळाला आहे मात्र सरासरी 120 रुपयांपर्यंत त्यांना दर नेहमी मिळालाच आहे. सहा टन ड्रॅगन फ्रुट चे त्यांना सात लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. शेख यांची ड्रॅगन फ्रुटची आता आठ एकर शेती आहे. गुंतवणुकीपेक्षा जास्त मोबदला या पिकांमध्ये असल्याचे ते सांगतात. फेसबुक वरून वेगवेगळ्या देशातील शेतकऱ्यांकडून त्यांनी या पिकाबद्दलची माहिती घेतली होती त्यानंतर इजराइल तंत्रज्ञान वापरत हे पीक वाढवल आहे असे ते सांगतात. कमी जागेमध्ये
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या