A Man Arrested for killing Wife and daughter by Releasing Cobra Snake: भारतात गुन्हेगारीच्या नवीन नवीन प्रकरण मोठ्या प्रमाणात समोर येत असतात. काही वेळा तर नातेवाईक, घरचे हे सुद्धा काटा काढण्यासाठी मागे पुढे बघत नाहीत. अशीच एक घटना समोर येत आहे ही घटना तुम्ही वाचल्यास तुमचाही थरकाप होणार आहे. ओडिसा मधून आलेली ही घटना या घटनेत पतीने आपल्या पत्नीचा काटा काढण्यासाठी एक कट रचला. हा कट उघडकीस आल्यानंतर तेथील पोलीस ही चक्रावले आहेत.
ही घटना वाचल्यानंतर एखादी व्यक्ती स्वतःच्या कुटुंबा विरुद्ध किंवा स्वतःच्या पत्नी विरुद्ध आणि मुली विरुद्ध असा कसा कट रुचू शकते असा प्रश्न सर्वांना पडत आहे. उडीसा राज्यातील गंजम या जिल्ह्यामध्ये एका घरामध्ये आई आणि तिच्या दोन वर्षे वयाच्या निरागस मुलीला साप चावल्याने मृत्यू झाल्याची बातमी पोलिसांना मिळाली. मुलीला आणि आईला साप चावल्यावर तिच्या कुटुंबीयांनी त्या सापाला तात्काळ मारले. ओडिसातील गंजम जिल्ह्यामध्ये सूर्य नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडल्याचे समोर आले.
घडलेल्या घटनेनंतर मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी नातीची आणि आपल्या मुलीची हत्या झाल्याचा आरोप केला होता.
पोलिसांनी या घटनेचा तपास गांभीर्याने सुरू केला. बसंती या मृत महिलेच्या पती गणेश याच्यासोबत बसंती च लग्न तीन वर्षांपूर्वी झालं होतं. यानंतर त्यांना आता एक मुलगी ही होती. मात्र पती गणेश त्याच्या पत्नीवर बऱ्याच वेळा संशय घेत असे. आणि या कारणामुळेच दोघांमध्ये वारंवार खटके ओढायचे.
यानंतर पती गणेशने स्वतःच्या मुलीला आणि पत्नीला संपवण्याचा प्लॅन केला त्यानुसार त्याने एका सर्पमित्रांकडून नाग साप घेतला. मुलगी आणि त्याची पत्नी ज्या खोलीमध्ये झोपले होते तेथे त्यांने साप सोडला. खोलीमध्ये त्या दोघींनाही सापाने चावा घेतला. त्या दोघींना हिंजीलाकट शासकीय हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर हा मृत्यू विषारी सर्पदंशामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. मृत महिलेच्या वडिलांनी आपली नात आणि आपली मुलगी हिची हत्या केल्याचे आरोप जावयावर लावले आणि तक्रार दाखल केली.
पोलीस प्रभारी निरीक्षक प्रवत कुमार साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत महिलेच्या वडिलांनी तक्रार दिली होती या तक्रारीत मुलीला गणेशने सापाने मारले असावे अशी माहिती दिली आली होती.
12 ऑक्टोंबर रोजी आमच्याकडे ही तक्रार आली होती त्यानंतर आम्हाला पोस्टमार्टम रिपोर्ट मिळाला यात स्पष्टपणे नमूद होते की नातीचा आणि मुलीचा मृत्यू साप चावल्यामुळे झाला आहे. दोघींना साप चावल्यावर सकाळपर्यंत साप एकाच खोलीत कसा राहिला यावर विचार केल्यावर आम्हाला संशय निर्माण झाला अशी माहिती पोलीस प्रभारी निरीक्षकांनी दिली.
मृत महिलेच्या वडिलांनी केलेल्या आरोपांच्या आधारे आम्ही तपास सुरू केल्यावर गणेशने विषारी साप एका सर्व मित्राकडून खरेदी केला होता अशी माहिती मिळाली तर त्या सर्पमित्राकडे चौकशी केली असता गणेशने 6 ऑक्टोबर रोजी घरात विशेष पूजा करत असल्याच्या बहाण्याने विषारी साप मागितल्याचे उघडकीस आले.