नाशिक येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरामध्येच खेळत असलेल्या चिमुकलीवर गरम भाजी सांडल्यामुळे गंभीरित्या जखमी झाली. तर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. 
पुढारी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, चिमुकलीचे नाव श्रीनिधी गणेश भोसले असे असून ती सुभाष रोड नाशिक येथील रहिवाशी होती.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗

श्रीनिधी ही चिमुकली घरामध्ये खेळत होती त्याचवेळी तिच्या अंगावर गरम भाजी पडल्यामुळे गंभीररित्या भाजली गेली. भाजलेल्या अवस्थेमध्ये तिला एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला. 

श्रीनिधीच्या अशा मृत्यूने परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. आडगाव येथील पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद या प्रकरणी केली आहे.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now