चीन मधल्या बीजिंग तसेच लिओनिंग पासून 500 मैल ईशान्येकडे, शाळकरी मुले आजारी पडण्याचे पेव फुटले आहेत. या तापाचा सामना करत असताना त्यांना संघर्ष करावा लागत असून तेथील संसाधनांवर याचा ताण पडत आहे. तेथील स्थानिक मीडियाच्या अहवाला नुसार या तापाच्या उद्रेकामुळे शाळा बंद करण्याची शक्यता आहे.
मिष्ट्री न्युमोनिया बाधित मुलांना फुफ्फुसात जळजळ तसेच उच्च ताप यासोबत इतर असामान्य लक्षणे दिसत आहेत, मात्र सामान्य खोकला व फ्लू, आरएसव्ही आणि इतर श्वसन आजारांशी संबंधित लक्षणे दिसत नाहीत.
मानव आणि प्राण्यांमधील जगभरातील रोगांच्या प्रादुर्भावाचा मागोवा घेत असलेली ProMed ही कंपनीकडून लहान मुलांना प्रभावित करणार्या "निदान न झालेल्या न्यूमोनिया" या साथीच्या संदर्भात मंगळवारी सायंकाळी एक इशारा जारी केला.