मध्य प्रदेशातील विधानसभेच्या 230 जागांसाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान सुरू आहे. भिंडमधील मोहगाव विधानसभा मतदारसंघात मतदानादरम्यान मतदान केंद्रावर दगडफेक करण्यात आली. 
BJP candidate injured in stone pelting on polling day

मोहगाव येथे झालेल्या दगडफेकीत भाजपचे उमेदवार राकेश शुक्ला जखमी झाले आहेत. शुक्ला यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यानंतर मतदान केंद्राबाहेर गोळीबाराची घटना घडल्याचे वृत्त आहे.

मध्य प्रदेशमध्ये विधानसभेच्या 230 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान होणार असून, 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत मुख्य लढत भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आहे. भाजप नेते शिवराज सिंह चौहान हे विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ हे माजी मुख्यमंत्री आहेत. याशिवाय समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, आम आदमी पार्टी आदी पक्षही निवडणुकीत सहभागी होत आहेत.