अमेरिकेच्या लष्करी गुप्तचर विभागाचे विमान समुद्रात पडल्याने अपघात ग्रस्त झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. यु एस आर्मीचे हे विमान धावपट्टीवर उतरणार होते मात्र समुद्रामध्ये धावपट्टीच्या पलीकडे जाऊन पडले. विमानामध्ये अमेरिकन लष्कराच्या नऊ कमांडो होते हे नऊ कमांडो गुप्तचर विभागाचे असल्याचे माहिती मिळत आहे.
There is a shocking information that the plane of the US military intelligence department has suffered an accident after falling into the sea.

यु एस मरीन बेसवर हा अपघात झाला असून हे युएस मरीन बेस होनोलुलू च्या पश्चिमेला 10 मैलांवर आहे. अपघात ग्रस्त झालेले विमान अमेरिकन नौदलाच्या असून P-8A विमान हे विमान आहे. विमान लँड करत असताना लँडिंग चुकल्याने समुद्रात जाऊन कोसळले.

विमान लँड करत असताना मुसळधार पाऊस होता. त्याचवेळी हे विमान समुद्रामध्ये कोसळल्याची घटना घडली आहे. यु एस आर्मीचे हे विमान कानोहे खाडीत तरंगत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळते. तातडीने बचाव पथकाने मदतीसाठी धाव घेतली असून विमानामधील नऊ जणांना बोटीने किनाऱ्यावर आणले आहे. 

P-8A विमानांचा वापर अमेरिकन लष्कर गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी करते. हे विमान नौदलाकडे असून याची निर्मिती बोईंग द्वारे केली जाते. यु एस आर्मीचे या लष्करी बेस वर 25 हजार पेक्षा जास्त खलाशी कुटुंबातील सदस्य आणि नागरिक कर्मचारी राहतात.

तेथील अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार विमानामध्ये आगीची घटना सुद्धा घडली असती मात्र अशी कोणतीही दुर्घटना विमानामध्ये घडली नाही. दरम्यान विमानामधील नऊ कमांडोना वाचवण्यात यश आलेला आहे.