जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

Ind vs NZ semifinal: मोहम्मद सिराजच्या ऐवजी 'या' मॅचविनर खेळाडूची होणार एंट्री?

Ind vs NZ semifinal world cup: नेदरलँड विरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात मोहम्मद सिराज कॅच घेत असताना सुटून मानेवर बॉल आढळला आणि त्याला दुखापत झाली आता एका दिवसावर येऊन ठेपलेल्या सेमी फायनल सामन्यात मोहम्मद सिराजच्या जाग्यावर नवीन मॅच विनर खेळाडूची एन्ट्री होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे.
R. Ashwin/ Shardul Thakur enter instead of Mohammad Siraj?

मोहम्मद सिराज नेदरलँड विरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये झेल पकडत असताना टायमिंग चुकून त्याच्या चेंडू हातात न येता गळ्यावर आढळला. आणि मोहम्मद सिराजला दुखापत झाले आणि ही दुखापत गंभीर असल्याने पुन्हा गोलंदाजी त्याला देण्यात आली नाही. त्यामुळे भारताच्या फलंदाजांना षटकं टाकावे लागले. मोहम्मद सिराज ला झालेली ही दुखापत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भारतीय संघाने मोहम्मद शिराजला पर्याय म्हणून एका मॅच विनर खेळाडूची निवड केली आहे. 

वर्ल्ड कप 2023 मधील भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सेमी फायनल सामना मुंबई मधील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर असलेली खेळपट्टी ही फलंदाजांसाठी पोषक असल्याचे पाहायला मिळते. पीचवर जास्त धावा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. म्हणून न्यूझीलंड विरुद्ध च्या सामन्यात फक्त गोलंदाज संघात घेऊन चालणार नाही तर ऑलराऊंडर खेळाडू संघात असायला हवा. ज्याला चांगली फलंदाजी ही जमेल आणि गोलंदाजी ही अन त्यासाठी भारतीय संघामध्ये दोन अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला आहेत. शार्दुल ठाकूर आणि आर आश्विन हे दोन खेळाडू अष्टपैलू असल्याचे पाहायला मिळतात. शार्दुल ठाकूर यांच्या घरच्या मैदानावर हा सामना होणार आहे. तर आर अश्विन याच्याकडे चांगला अनुभव आहे. (India vs Newzealand cricket world cup Semifinal)

न्यूझीलंड विरुद्ध असलेला हा सेमी फायनल चा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर हा सामना भारताने गमावला तर त्यांची या वर्ल्डकप (World Cup 2023) मधील आव्हान संपुष्टात येणार आहे. आणि जर जिंकला तर त्यांना 19 तारखेला फायनल मॅच (World Cup Final) साठी खेळता येणार आहे. त्यामुळे या सामन्यात जर मोहम्मद सिराज खेळत नसेल तर त्या जागी आर आश्विन ची निवड संघामध्ये होऊ शकते अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे सेमी फायनल साठी शार्दुल ठाकूर की आर अश्विन हा प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. 
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या