CTET परीक्षेमध्ये दोन पेपर असतात- पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 हा इयत्ता 1 ते 5 पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे आणि पेपर 2 हा इयत्ता 6 ते 8 पर्यंत शिकवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी आहे.
CTET परीक्षा (Central Teacher Eligibility Test) वर्षातून दोनदा, साधारणपणे जुलै आणि जानेवारीमध्ये घेतली जाते. CTET-Jan2024 साठी नवीनतम अधिसूचना 3 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झाली आहे आणि त्याच तारखेपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया(online application process) सुरू झाली आहे.
last date of ctet 2024: ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 नोव्हेंबर 2023 आहे. CTET-Jan2024 परीक्षा 28 जानेवारी 2024 रोजी ऑफलाइन पद्धतीने (पेन-पेपर आधारित) घेतली जाईल.
CTET परीक्षेत प्रत्येक पेपरमध्ये 150 MCQ प्रश्न असून व कालावधी 2.5 तास असतो. दोन्ही पेपरसाठी अभ्यासक्रम आणि परीक्षा नमुना माहिती बुलेटिनमध्ये दिलेला आहे, जो अधिकृत वेबसाइट ctet.nic .in वरून डाउनलोड केला जाऊ शकतो. CTET परीक्षा 20 भारतीय भाषांमध्ये घेतली जाते, आणि उमेदवार त्यांच्या शिक्षणाचे माध्यम म्हणून कोणतीही दोन भाषा निवडू शकतात.
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका का सोडवायला हवं?
मागील वर्षाचे प्रश्न सोडवणे (PYQ) ही परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त धोरण आहे, विशेषत: UPSC किंवा CTET सारख्या स्पर्धात्मक परीक्षा देण्यासाठी खूप उपयोगी आहे.
CTET PYQ सोडवण्याचे काही फायदे येथे आहेत:
प्रश्नांचा पॅटर्न: प्रश्नांचे प्रकार, स्वरूप आणि विषय समजण्यासाठी मदत होते. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा पॅटर्न तुमच्या लक्षात यायला मदत होते.
वेळ व्यवस्थापन: वेगवेगळ्या प्रश्नांना वेगवेगळ्या भागाला किती वेळ द्यावा याचा सराव प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर होतो. प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर सोडवल्यावर आपल्याला वेळ व्यवस्थापन कसे करता येईल याची कौशल्य अंगी येतात.
ताकद आणि कमकुवतता: विविध विषयांवर आणि संकल्पनांवर आपल्या कामगिरीचे आणि अचूकतेचे मूल्यांकन आपल्याला करता येते. ज्या गोष्टींना जास्त वेळ लागतो किंवा ज्या गोष्टी चुकतात त्या गोष्टी सुधारणा करता येतात आणि आपली ताकद काय आहे आणि कमवता काय आहे हे समजते.
सैद्धांतिक ज्ञान : अभ्यासक्रमामध्ये कोण कोणत्या विषयांमध्ये खोली आहे कोण कोणते विषयांमध्ये वरवरचे प्रश्न विचारले आहेत ह्या गोष्टींची समज प्रीवियस ईयर क्वेश्चन पेपर सोडवल्यानंतर येते. यामुळे आपले सैद्धांतिक ज्ञान अधिक मजबूत होऊ शकते.
परीक्षेची चिंता: परीक्षेच्या वातावरणासोबत आपण परिचित होतो परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात कोणता प्रश्न कोणत्या भागामध्ये येतो या सर्वांची माहिती होऊन आपला आत्मविश्वास दुणावतो आणि परीक्षेची चिंता कमी होते.
PYQ सोडवल्यावर आपल्याला परीक्षा पद्धती प्रश्नपत्रिका काठिण्य पातळी याबाबतची माहिती होते. त्यामुळे आपल्याला गुण जास्त मिळण्यास आणि ध्येय साध्य करण्यास मदत होऊ शकते.
CTET Previous Year Question Paper PDF Download Link
मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आलेले आहेत. या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करून यांचा अभ्यास भरपूर करा. परीक्षा सोपी जायला मदत होईल.
Question Paper August 2023:
- Paper 1: Set A.PDF : Download Now
- Paper 1 : Set B.PDF : Download Now
- Paper 1 : Set C.PDF: Download Now
- Paper 1 : Set D.PDF: Download Now
- Paper 2 : Set E.PDF: Download Now
- Paper 2 : Set F.PDF: Download Now
- Paper 2 : Set G.PDF: Download Now
- Paper 2 : Set H.PDF: Download Now