सीटेट 2024 जानेवारी सेशनचे रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाने सुरू केलेली आहे. काही दिवसांपूर्वी सीटीईटी 2024 याबद्दलची अधिकृत नोटिफिकेशन्स सीबीएससी कडून अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आलं होतं. या नोटिफिकेशनच्या आधारावर CTET 2024 मध्ये काही बदल करण्यात आले आहेत. आपल्याला सांगू इच्छितो की इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षक भरतीसाठी सीटीईटी परीक्षा ही किमान योग्यता मानली जाते. शिक्षक होण्यासाठी उमेदवारांना CTET एक्झाम क्वालिफाय व्हावच लागतं.
जे उमेदवार जानेवारी 2024 मध्ये होणाऱ्या सीटीईटी शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये बसू इच्छितात त्यांनी हे अधिकृत नोटिफिकेशन नक्कीच वाचायला हवं. यामुळे परीक्षा पॅटर्न, सिल्याबस यामध्ये जे काही बदल केले आहेत त्याबद्दलची माहिती मिळते. जर तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मध्ये बसायचं असेल तर तुम्हाला 23 नोव्हेंबर 2023 च्या अगोदर अर्ज करायला हवं. उमेदवार परीक्षेचा नवीन पॅटर्न चेक करू शकतात. (CTET New Exam Pattern) एक्झाम चा नवीन पॅटर्न आम्ही येथे सुद्धा देत आहोत आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही स्वतः चेक पण करू शकता.
CTET New Exam Pattern
सीटीईटी परीक्षेमध्ये दोन पेपर आयोजित करण्यात येतात. पेपर पहिला हा इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत असतो. या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 50% गुण मिळवावे लागतात. सोबतच दोन वर्षाचा डिप्लोमा इन एलिमेंट्री म्हणजेच डीएलएड किंवा डी टी एड करावा लागतो. याशिवाय चार वर्षाचा डी एल एड कोर्स अभ्यास केलेले विद्यार्थी देखील हा पेपर देऊ शकतात. तर पेपर दोन हा इयत्ता सहावी ते आठवी इयत्तेसाठी शिकवण्यासाठी असतो. यामध्ये पदवीसोबत आपल्याला डिप्लोमा इन एलिमेंट्री एज्युकेशन म्हणजेच डी एल एड किंवा ग्रॅज्युएशन मध्ये 50% मार्कांसोबत चार वर्षाचा बीएड डिग्रीधारक उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा 2024 देण्यासाठी बसू शकतो. ही परीक्षा पास झाल्यानंतर इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत तो उमेदवार शिक्षक बनू शकतो.
सीटीईटी 2024 सिलेबस ( CTET exam syllabus)
सीटीईटी 2024 या परीक्षेचा आयोजन देशामधल्या वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर वीस भाषांमध्ये आयोजित करण्यात येते. यामध्ये मुख्य भाषा इंग्रजी आणि हिंदी असते याशिवाय इतर अन्य भाषा देखील या परीक्षेमध्ये तुम्ही निवडू शकता. गुजराती मराठी तमिळ नेपाळी बंगाली मल्याळम ओडिया मणिपुरी पंजाबी उर्दू कन्नड इत्यादी भाषांमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. इयत्ता पहिली ते पाचवी साठी गणित आणि पर्यावरण अध्ययनमध्ये शैक्षणिक समझ अनुप्रयोग इत्यादी ंचा आधार धरून एनसीईआरटी अभ्यासक्रमावर आधारित या परीक्षेचा सिल्याबस तयार करण्यात आला आहे.
-
सीटीईटी 2024 परीक्षा पैटर्न
सीटीईटी 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये काही बदलाव करण्यात आले आहेत. सीईटी परीक्षा अभ्यासक्रमामध्ये बाल विकास एवं शिक्षा शास्त्र यामध्ये तीस प्रश्न अनिवार्य असणार आहेत. भाषा एक मध्ये 30 प्रश्न (अनिवार्य) भाषा दोन मध्ये 30 प्रश्न (अनिवार्य) गणित एवं विज्ञान मध्ये एकूण 60 प्रश्न तर सामाजिक अध्ययन किंवा सामाजिक विज्ञान यामध्ये 60 प्रश्न असे मिळून एकूण दीडशे प्रश्नांचा पेपर असणार आहे. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण दिला जाणार आहे. या परीक्षेमध्ये कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. त्यामुळे उमेदवार जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकतात.
इयत्ता 1 ते 5 च्या शिक्षकांसाठी
पेपर एक मध्ये एकूण पाच भाग होणार आहेत. भाषा एक भाषा दोन बालविकास आणि शिक्षा शास्त्र पर्यावरण अध्ययन गणित अशा सगळ्या भागांवर तीस तीस प्रश्न असणार आहेत. प्रत्येक प्रश्नावर बरोबर उत्तर आल्यास एकेक गुण मिळणार आहे म्हणजेच 150 प्रश्न या प्रश्नपत्रिकेत असून जर बरोबर आलेत तर दीडशे गुण मिळणार आहेत.
इयत्ता 6 ते 8 च्या शिक्षकांसाठी
पेपर दोन मध्ये एकूण पाच भाग असणार आहेत. भाषा एक आणि भाषा दोन बाल विकास आणि शिक्षण शास्त्र सामाजिक अध्ययन किंवा सामाजिक विज्ञान ( हा पेपर फक्त सामाजिक विज्ञान किंवा सामाजिक अध्ययन विषय असणाऱ्यांसाठी आहे) आणि गणित आणि विज्ञान ( हा पेपर फक्त गणित किंवा विज्ञान शाखा असणाऱ्या शिक्षकांसाठी असणार आहे) पेपर दोन मध्ये एकूण 150 प्रश्न असणार आहेत. भाषा एक साठी 30 प्रश्न भाषा दोन साठी 30 प्रश्न बालविकास आणि शिक्षण शास्त्र यासाठी 30 प्रश्न गणित आणि विज्ञान यासाठी 60 प्रश्न सामाजिक अध्ययन आणि सामाजिक विज्ञान यासाठी 60 प्रश्न असे एकूण 150 प्रश्नांसाठी 150 गुण असणार आहेत.
डाऊनलोड मागील वर्षाचा प्रश्नपत्रिका (Download Previous Year Question Paper PDF)
सीटीईटी प्रश्नपत्रिका डिसेंबर 2018 - 🔗 Question Paper December 2018.PDF
सीटीईटी प्रश्नपत्रिका जुलै 2019 - 🔗 Question Paper July 2019.PDF
सीटीईटी प्रश्नपत्रिका डिसेंबर 2019 - 🔗 Question Paper December 2019.PDF
सीटीईटी प्रश्नपत्रिका जानेवारी 2021 - 🔗 Question Paper January 2021.PDF
सीटीईटी प्रश्नपत्रिका डिसेंबर 2021 - 🔗 Question Paper December 2021.PDF
सीटीईटी प्रश्नपत्रिका डिसेंबर 2022 - 🔗 Question Paper December 2022.PDF
सीटीईटी प्रश्नपत्रिका ऑगस्ट २०२३ - 🔗 Question Paper August 2023.PDF
सीईटी जानेवारी 2024 शिक्षक पात्रता परीक्षा साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर 23 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करायच आहे. सीईटी 2024 या परीक्षेचा आयोजन 21 जानेवारी 2024 दिवशी करण्यात येणार असून देशातील 135 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. शेवट तारखेच्या अगोदरच उमेदवारांनी या परीक्षेसाठीचा पात्रता अर्ज भरून शिक्षक पात्रता परीक्षा 2024 मध्ये सामील व्हा.