तमाशा संचामधील दोघांचा मृत्यू विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने झाला. मोताळा तालुक्यात पान्हेरा खेडी या गावांमध्ये तमाशा फड उभारत असताना लोखंडी पाईपचा स्पर्श विद्युत तारे झाल्याने दोघांचा मृत्यू झाली असल्याचे दुर्घटना घडली आहे.
मोताळा तालुक्यात पान्हेरा खेडी या गावात यात्रा सुरु झाली असून जळगाव इथल्या आनंद लोकनाट्य मंडळातील कामगार तेथे तमाशाचा फड उभा करत होते. हा फड उभा करत असताना लोखंडी पाईप चा स्पर्श विद्युत तारेला झाल्याने अंकुश भारुडे, विशाल भोसले यांचा मृत्यू झाला. नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील अंकुश भारुडे आहेत तर राजुर गणपती( जालना) विशाल भोसले आहेत. कार्यक्रम आयोजित करण्यात आलेल्या ठिकाणी तमाशाचे फड उभारण्याचे काम दोघे खूप वर्षांपासून करतात. धामणगाव बढे पोलीस स्टेशन येथील ठाणेदार सुखदेव भोरकडे हे कर्मचाऱ्यांसोबत दाखल
घटनास्थळी धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव भोरकडे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पुढील तपास चालू असल्याची माहिती मिळत आहे.