जीवन मराठीयुट्युब चॅनेललासबस्क्राईब करा

वीरेंद्र सेहवागने उडवली 'अश्या' शब्दात खिल्ली; म्हणाला, पाकिस्तान 'जिंदा'भाग😄

Ex Cricketer Virender Sehwag trolls Pakistan Cricket World Cup 2023 : 
गुरुवारी न्यूझीलंडने बंगळुरू येथे झालेल्या मॅच मध्ये श्रीलंकेला पराभूत केलं. त्यामुळे आता पाकिस्तान या वनडे विश्वचषक 2023 मधून जवळपास बाहेरच पडला आहे.
Ex Cricketer Virender Sehwag trolls Pakistan

भारताचा माजी सलामीवर फलंदाज वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानच्या या टीमला ट्रोल केल आहे. या विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघाला पराभूत करण्यासाठी आलेल्या पाकिस्तानच्या संघाने त्यांचे पहिले दोन सामने जिंकले होते मात्र टीम इंडियाने पाकिस्तानच्या संघाचा पराभव करत बाजी मारली. अफगाणिस्तानच्या संघानही पाकिस्तानच्या या संघाला हरवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानचे आणखी मान हानी झाली. आता यातच सेहवागने देखील पाकिस्तानला ट्रोल केल आहे. -

पाकिस्तान क्रिकेट संघाला वीरेंद्र सेहवागने वाईट शब्दांमध्ये ट्रोल केल आहे. बाय बाय पाकिस्तान असं इंस्टाग्राम वर पोस्टर शेअर केल आहे. आणि त्याखाली कॅप्शन लिहिलं आहे पाकिस्तान जिंदाभाग... तर पाकिस्तानचा शेवटचा साखळी फेरीतील सामना कोलकत्ता येथे शनिवारी ईडन गार्डन्स मैदानावर इंग्लंड सोबत होणार आहे. इजमाम उलहक्क हे मुख्य सिलेक्टर असून यांनी राजीनामा दिलाय. तर पाकिस्तानचा कॅप्टन असलेला बाबर आजम याची कॅप्टनचे देखील धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. याबाबत आता सेवागने पोस्ट केल आहे. पोस्ट करत तो म्हणाला गुडबाय अलविदा पाकिस्तान. तुमचा प्रवास येथे संपतोय. आमच्याकडचा पाहुणचार आणि बिर्याणी खाल्ली. बरे वाटले. आता सुरक्षितपणे पाकिस्तानला परतण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. सेहवागच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल आहे.

श्रीलंकेवर न्यूझीलंडने 160 चेंडू राखत पाच गडी सुद्धा राखत मिळवलेल्या विजयामुळे त्यांचा नेट रन रेट +0.743 वाढला आहे उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान श्रीलंकेवर मिळवलेल्या विजयामुळे जवळपास निश्चित झाले आहे. न्यूझीलंडने गुरुवारी श्रीलंकेवर पाच गडी राखून विजय मिळवला आहे. आत्तापर्यंत भारत-दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी उपांत्य फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. त्यासोबतच आता न्यूझीलंडचा संघ आपले स्थान निश्चित करण्यासाठी पुढे पावले टाकत आहे.





व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉 Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉 Join Now

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या