Bigg Boss 17: बिग बाॅस 17 च्या घरात मोठे हंगामे होताना दिसत आहेत. विकेंडच्या वारमध्ये नुकताच धमाका झाला. घरातील प्रत्येक सदस्याचा सलमान खान याने जवळपास क्लास लावला. टीआरपीमध्ये म्हणावा तसा धमाका करण्यात यश बिग बाॅस 17 ला अजूनही मिळाले नाहीये. चाहत्यांमध्ये बिग बाॅस 17 बद्दल क्रेझ आहे.
विकेंडच्या वारमध्ये बिग बाॅस 17 च्या घरातील सदस्य हे ढसाढसा रडताना दिसले.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
काही वेळ भावनिक वातावरण हे घरात बघायला मिळाले. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्या क्राईम पत्रकार जिग्ना वोरा आहेत. बिग बाॅसमधून बाहेर जिग्ना वोरा जात असल्याचे कळताच मुनव्वर फारुकी हा थेट रडायला लागला. आता नुकताच एक मुलाखत जिग्ना वोरा यांनी दिलीये. जिग्ना वोरा
या मुलाखतीमध्ये अत्यंत मोठे खुलासे करताना दिसल्या आहेत. जिग्ना वोरा यांच्याकडून थेट सना रईस खान हिची पोलखोल करण्यात आलीये. जिग्ना वोरा यांनी तिचा खरा चेहरा हा दाखवला आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसला. विकी जैन अंकिता लोखंडे हिचा पती आणि सना हे एकमेकांचे हात पकडून बसल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसले. सर्वांनाच ही गोष्ट खटकली. विकी जैन याच्यावर सना लाईन मारत आहे असे अनेकांनी म्हटले आहे. मात्र, याबद्दल अजिबातच काहीच कल्पना अंकिता लोखंडे हिला नाहीये.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
जिग्ना वोरा यांनी यावर खुलासा केलाय. जिग्ना वोरा म्हणाल्या की, मुळात म्हणजे नाॅमिनेशनपासून सना ही प्रचंड घाबरते. सना हिला काहीही करून बिग बॉस 17 मध्ये राहायचे आहे. आपल्याला बिग बाॅस 17 च्या घरात अधिक दिवस राहायचे असेल तर आपल्याला विकी जैन याच्यासोबत राहणे महत्वाचे आहे हे सना हिला चांगले माहिती आहे. बिग बॉस 17 च्या घरात राहण्यासाठी सना ही त्यासाठी काहीही करू शकते.
बिग बाॅस 17 च्या विजेत्याबद्दल थेट जिग्ना वोरा यांनी यावेळी सांगून टाकले आहे. बिग बाॅस 17 चा विजेता हा मुनव्वर फारुकी असेल, तो चांगला गेम खेळत आहे असे जिग्ना वोरा म्हणाल्या आहेत.
मनोरंजन क्षेत्रातील सर्व बातम्या वाचा एका क्लिकवर👆🔗
जिग्ना वोरा यांनी यावेळी थेट अंकिता आणि विकी जैन यांच्या रिलेशनबद्दल देखील भाष्य केले. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यामध्ये मोठे वाद होताना बिग बाॅसच्या घरात दिसत आहेत.
जिग्ना वोरा म्हणाल्या, अंकिता लोखंडे हिला विकी अजिबात वेळ देत नाही. कारण मुळात म्हणजे विकी भाई घरात गेममुळे खूप व्यस्त आहे. जिग्ना वोरा यांनी म्हटले की विकी वेळ देत नसल्यामुळे अंकिता लोखंडे हिची चिडचिड होत आहे. विकी जैन आणि अंकिता लोखंडे यांच्यामध्ये बिग बाॅसच्या घरात दाखल झाल्यापासून मोठी भांडणे बघायला मिळत आहेत.
व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा👉
Join Now
टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा 👉
Join Now