सोशल मीडियावर हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर दमदार प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांना या ट्रेलर मधून वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट एका अलग धाटणीने प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अनिल कपूरने या चित्रपटामध्ये रणबीर कपूरच्या वडिलांचे पात्र निभावले आहे. उद्योगपती म्हणून अनिल कपूर या चित्रपटामध्ये काम करत आहे तर गँगस्टर चे काम रणबिर कपूरने केले आहे. अज्ञातांनी आपल्या वडिलांवर घातलेल्या गोळ्यांचा बदला रणबिर घेताना दिसतो. आता तो या चित्रपटात कशा पद्धतीने बदला घेतो या सर्वाचा उलगडा चित्रपट पाहिल्यानंतरच होणार आहे.
ॲनिमल चित्रपटांमध्ये बॉबी देओल कोणते पात्र करणार आहे याबाबत मात्र कोणतीच माहिती अजून समोर येत नाही. चित्रपटामध्ये असलेल्या चौघांच्या अभिनयाने ट्रेलरकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाले आहे.
तर टेलरच्या शेवटी आपल्याला रणवीर आणि बॉबी देओलचा फायटिंग सीन पाहता येत आहे. तर रणवीर आणि रश्मिका मानधना यांच्यातील वाद सुद्धा या ट्रेलर मध्ये पाहता येतोय. सोशल मीडियावर काही वेळापूर्वीच हा ट्रेलर रिलीज झाला असून काही क्षणांमध्येच या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
Ranbir Kapoor And Rashmika Mandanna Animal Film
संदीप रेड्डी वंगा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुख्य भूमिका रणवीर कपूर, रश्मिका मंदान्ना बॉबी देओल आणि अनिल कपूर यांनी साकारली आहे. ॲनिमल चे पात्र रणबीर कपूर ने या चित्रपटात केले असून उद्योगपती बलबीर सिंग हे पात्र अनिल कपूरने साकारले आहे. येत्या एक डिसेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला थेटरमध्ये येत आहे.