या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, संजय कुमार 15 दिवसांची रजा संपवून 21 नोव्हेंबर रोजी ड्युटीवर परतले.
त्यानंतर चार दिवसांनी सोमवारी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. संजय हे गार्ड रूममध्ये ड्युटी करत होते. यावेळी त्यांनी एके 47 ने गोळी झाडली त्यामुळे त्यांचा जागीवरच मृत्यू झाला. गोळ्यांच्या आवाजाने छावणीत गोंधळ उडाला.
एसपिंसह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या प्रकरणा मागील कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदनासाठी जवानाचा मृतदेह रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव रांचीहून विमानाने घरी पाठवण्यात येणार आहे.