रोज आपण अपघाताच्या बातम्या वाचतच असतो. असेच एक धक्कादायक बातमी सोलापूर जिल्ह्यातून येत आहे. सोलापूर तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने झाला आहे. बस वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यांमध्ये जाऊन आदळली असल्याची माहिती मिळत आहे. 
The accident of ST bus on Solapur Tuljapur highway has occurred due to the driver losing control over the steering.

मंगळवारी दुपारच्या सुमारास सोलापूर तुळजापूर महामार्गावर एसटी बसचा अपघात झाला असून एसटी बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण न राहिल्याने हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातामध्ये बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जोरदार आदळली आहे. बस खड्ड्यात आढळल्यामुळे बसमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाल्याची वृत्त हाती आले आहे.

कासेगाव परिसरात सोलापूर तुळजापूर महामार्गावर हा अपघात घडला असून पुणे कर्नाटक मराठवाडा येथील प्रवासी या बस मधून प्रवास करत होते. या झालेल्या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले असून सिविल पोलीस चौकीमध्ये या अपघाताची नोंद करण्यात आली आहे. 

अचानक झालेल्या या अपघाताने प्रवासी गोंधळून गेले. बस देखील या अपघातात नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. तर बसचा समोरचा भाग या अपघातामध्ये खराब झाला आहे.