वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मार्लन सॅम्युअल्स 2019 मध्ये अबू धाबी T10 दरम्यान भ्रष्ट वर्तनासाठी दोषी आढळला होता. त्यामुळे त्याच्यावर ICC ने 6 वर्षांसाठी सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्यास बंदी घातली आहे. 
Marlon Samuels banned from all forms of cricket for 6 years

सॅम्युअल्सला एका स्वतंत्र न्यायाधिकरणाने चार गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवले असून यात स्वत:ची आणि खेळाची बदनामी करणारे पक्षकार स्वीकारणे त्याच सोबत तपास अधिकाऱ्यांकडून माहिती लपवणे असे गुन्हे आहेत. 

सप्टेंबर 2021 मध्ये सॅम्युअल्सवर ICC (ECB कोड अंतर्गत नियुक्त भ्रष्टाचार विरोधी अधिकारी म्हणून त्याच्या क्षमतेनुसार) आरोप ठेवण्यात आले होते. त्याला ऑगस्टमध्ये या वर्षी न्यायाधिकरणाने दोषी ठरवले असून सॅम्युअल्सवर ही बंदी 11 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाली.

अशाच एका गुन्ह्यात 15 वर्षांपूर्वी सॅम्युअल्सला शिक्षा झाली होती. 2008 मध्ये दोषी आढळल्यानंतर सॅम्युअल्सवर 2 वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

नोव्हेंबर 2020 मध्ये सॅम्युअल्स याने निवृत्तीची घोषणा केली होती ज्यात त्याने 67 T20 सामने, 207 एकदिवसीय आणि 71 कसोटी खेळले असून त्याने 11,000 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत तर या धावा मध्ये त्याने 17 शतके केली आहेत.